शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

साकोलीकरांना मिळणार दोन वेळा पाणी

By admin | Updated: June 1, 2016 01:52 IST

शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी दोनवेळेस पुरवठा करावे, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य हेमराज भारद्वाज यांनी केली होती.

भारद्वाज यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हाधिकाऱ्यांचे नगरपंचायतीला पत्रसाकोली : शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी दोनवेळेस पुरवठा करावे, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य हेमराज भारद्वाज यांनी केली होती. याची दखल प्रशासनाने घेवून आता दोन वेळेस पाण्याचा पुरवठा करण्याचे पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत साकोली - सेंदूरवाफाला नळाद्वारे पुरवठा करण्यात येणारे पाणी चार ते पाच वर्षापासून बंद करण्यात आले आहे. जवळील कुंभली येथील चुलबंद नदीच्या पात्रातून पुरवठा होणाऱ्या नदी पात्रात मानवी अंत्यसंस्कार होत असल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्याने पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे याचा फटका साकोलीकरांना बसला. सध्या तलाव वॉर्डातील गोबाडे टोली येथे पाच हॉर्सपावर पंप अस्तित्वात असून नळाद्वारे केवळ तलाव वॉर्ड, गणेश वॉर्ड व टोलीवॉर्डात पाणी पुरवठा तुरळक प्रमाणात होत आहे. २.१५ लाख लिटरची मर्यादा असलेल्या पाणी टाकीतून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य हेमराज भारद्वाज यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीला ग्रीन सिग्नल मिळाला असून भारद्वाज आहे. दरम्यान साकोली ग्रामपंचायतचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेने नगरपंचायतकडे हस्तांतरीत केली. तथापि, नगरपंचायतची निवडणूक न झाल्याने हे प्रकरण नगरपंचायतकडे हस्तांतरीत होवू शकत नाही. शहराला पुरवठा होत असलेले पाणी अपुरे असल्याने व कमी अश्वशक्तीचे मोटारपंप व त्यावरील दुरुस्ती खर्च ३० हजार असून नवीन पंप खरेदी करणे अपेक्षित आहे. हा खर्च १.१५ लाख असून नगरपंचायतकडे पाणी पुरवठ्याबाबत आवश्यक निधी व तांत्रिक कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने १ लक्ष ५० हजार रकमेचा खर्च नगरपंचायतीला स्वत:च्या निधीतून करावा लागेल असे पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायत साकोली प्रशासक ला २४ मे रोजी पाठविले आहे.काही का असो, माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य हेमराज भारद्वाज यांनी प्रशासनाकडे वारंवार पाण्याचा मुद्दा रेटून धरल्याने तो मार्गी काढण्यात आला आहे. साकोलीत आता सकाळी मिळणारे पाणी सकाळ - सायंकाळ दोन वेळा उपलब्ध होणार आहे. (शहर प्रतिनिधी)