शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा संकुलाला दुरवस्थेची साडेसाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:06 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे नामोल्लेख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिल्हा क्रीडा संकुलाची सध्या अवस्था दयनीय झाली आहे. विविध समस्यांची साडेसाती संपण्याचे नाव घेत नसून विकासाच्या दृष्टीने क्रीडा संकुलाचे रुपडे केव्हा पालटणार असा सवाल क्रीडाप्रेमी करीत आहेत. बुधवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असताना येथील जिल्हा क्रीडा संकुलांची समस्या कायम आहे.

ठळक मुद्देनिधीची वानवा कायम : गुणवंत खेळाडू घडणार तरी कसे?, क्रीडा संकुलाच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे नामोल्लेख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिल्हा क्रीडा संकुलाची सध्या अवस्था दयनीय झाली आहे. विविध समस्यांची साडेसाती संपण्याचे नाव घेत नसून विकासाच्या दृष्टीने क्रीडा संकुलाचे रुपडे केव्हा पालटणार असा सवाल क्रीडाप्रेमी करीत आहेत. बुधवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असताना येथील जिल्हा क्रीडा संकुलांची समस्या कायम आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुणवंत खेळाडूंची कमतरता नाही. प्रत्येक तालुका पातळीवर तालुका क्रीडा संकुल असले तरी त्यांची अवस्थाही फारशी चांगली नाही. अनेक तालुक्यात क्रीडा संकुलांची इमारत असली तरी ती शोभेची वास्तू ठरली आहे. खेळाडूंसाठी गुणवत्ता व दर्जात्मक साधने उपलब्ध नसल्याने खेळाडूंचा हिरमोड होत असतो. मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर, पवनी व लाखनी येथील क्रीडा संकुल परिसर विस्तीर्ण असला तरी अनेक सुविधांचा वाणवा कायम आहे.भंडारा शहरात बसस्थानक परिसराला लागून असलेल्या विस्तीर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे. या संकुलात खेळण्याचे मैदान, धावपट्टी, बास्केटबॉल, बॅडमिंटन यासह शालेय क्रीडास्पर्धा घेण्यांतर्गत मैदान उपलब्ध आहे. मात्र या क्रीडा संकुलात सुविधांचा अभाव आहे. धावपट्टी फक्त पाहण्यासारखी असून पावसाळ्यात याची देखरेख योग्यरित्या होत नाही. मुख्य मैदानात मोठ्या प्रमाणात गवत व पाणी साचले असून त्याचीही देखभाल करण्यात येत नाही. नाल्यांवरील जाळी तुटलेली असून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून येथे दिसत आहे. मात्र शासकीय पातळीवर कोणतीच उपाययोजना होत नसल्याने क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी आहे.क्रीडाप्रेमींची निराशाजिल्हा क्रीडा संकुलाला वैभव प्राप्त करून द्यावे असा मानस आजपर्यंत अनेक क्रीडा प्रेमींनी व्यक्त केला. मात्र निधीअभावी ते स्वप्न आजपावेतो पूर्ण झालेले नाही. क्रीडा क्षेत्रातील होत असलेला भ्रष्टाचार, कामे दाखवून लाटलेला निधी ही खरी बोंब क्रीडा संकुलाच्या विकासात आडकाठी ठरली आहे. जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने संकुलाच्या विकासासाठी प्रस्ताव पाठविला असला तरी तो मंजूर झालेला नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.