शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:18 IST

काही वर्षांपूर्वी केवळ महानगरातच होणारी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आता तालुका पातळीवरही होत असल्याचे दिसत आहे. साकोली येथील एका रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. एवढेच नाही तर अत्यल्प खर्चात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

ठळक मुद्देअत्यल्प खर्च : तालुक्याच्या ठिकाणी झालेली पहिलीच शस्त्रक्रिया

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : काही वर्षांपूर्वी केवळ महानगरातच होणारी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आता तालुका पातळीवरही होत असल्याचे दिसत आहे. साकोली येथील एका रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. एवढेच नाही तर अत्यल्प खर्चात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.साकोली हा तालुका राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर. या ठिकाणी आरोग्य सुविधांबाबत कायम बोंबाबोंब असते. मात्र येथील डॉक्टर भरत अग्रवाल यांनी या भागातील रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केला. अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचार होऊ लागले. त्यामुळे मृत्यूची संख्या कमालीची घट झाली. अशातच आता त्यांनी आपल्या रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. वयाची ५५ वर्ष पूर्ण झालेल्या महिलेचे दोन्ही गुडघे निकामी झाले होते. दैनंदिन काम करणे अडचणीचे होते. महानगरात जाऊन गुडघा प्रत्यारोपण करणे त्या महिलेच्या आवाक्याबाहेर होते. तिने हा प्रकार डॉ.अग्रवाल यांना सांगितला. त्यांनी साकोलीतच गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.कधीकाळी महानगरात होणारी ही शस्त्रक्रिया डॉ.अग्रवाल यांनी साकोली सारख्या तालुक्याच्या ठिकाणी करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण महिलेलाच दिलासा नव्हे तर संपूर्ण तालुक्याला यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.