शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

ग्रामीण एटीएम झाले कॅशलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:57 IST

दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हातात कार्ड घेवून या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशासाठी भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्देसलग सुट्यांचा परिणाम : दिवाळीच्या काळात नागरिक त्रस्त, पैशासाठी वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हातात कार्ड घेवून या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशासाठी भटकंती सुरू आहे.शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातील जनताही एटीएमचा वापर करू लागले आहे. गावागावात विविध बँकांनी आपले एटीएम सुरू केले आहे. बँकेच्या रांगेतून सुटका मिळत असल्याने तात्काळ पैसे काढण्यासाठी एटीएमचाच पर्याय ग्रामीण जनताही निवडत आहे. आता जणू एटीएमवरून पैसे काढण्याची सवयच झाली आहे. मात्र दिवाळीच्या सणात ग्रामीण भागातील एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट झाला आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना नो कॅशचा फलक पाहून परत यावे लागते. दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. या काळात प्रत्येजण बाहेरगावी जाण्याचे नियोजन करता. त्यासाठी सोबत पैसा असावा म्हणून एटीएमवरून पैसे काढले जातात. परंतु गत आठ दिवसांपासून ग्रामीण भागातील एटीएममध्ये ठणठणाट झाला आहे. अनेकजण तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी येवून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्या ठिकाणीही त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.तालुका मुख्यालयासह मोठ्या गावातील अनेक एटीएम गत आठ दिवसांपासून बंद आहेत. दिवाळीसारख्या सणात पैसे उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे रोख पैशांची टंचाई निर्माण झाली आहे. बँका बंद असल्याने बँकेतूनही पैसे काढणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना बाहेरगावी जाण्याचे नियोजन बदलवावे लागत आहे. आता सोमवारी बँका सुरू होतील. तेव्हाच नागरिकांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी बँकात मोठी गर्दी उसळणार आहे.लिंक फेलचाही फटकाकाही गावातील एटीएममध्ये पैसे असले तरी लिंक फेलचाही फटका बसत आहे. त्यामुळे अनेक एटीएम शटरबंद दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक याठिकाणी जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु लिंक फेलचा मॅसेज वाचून मनस्ताप सहन करतात. यासर्व प्रकाराने वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.