शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

गराडा नाल्यावर रनिंग हातभट्टी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

कारधा पोलीस ठाण्यात ठाणेदार श्रीराम लांबाडे रूजू झाले. त्यांनी ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशातच गराडा बुज. येथील नाल्यावर हातभट्टीची दारु काढली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराडे, शंकर चौधरी, देवेंद्र खडसे, विवेक रणदिवे, आकाश सोनुले, गजानन जाधव, रमेश वाघाडे यांनी धाड मारली.

ठळक मुद्देकारधा पोलीस । तीन क्विंटल मोहा सडवासह २० लिटर गावठी दारु जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील गराडा (बुज.) नाल्यावर हातभट्टीची दारु गाळली जात असल्याच्या माहितीवरून धाड टाकून पोलिसांनी रनिंग हातभट्टी उद्ध्वस्त केली. मोह सडवासह २० लिटर दारु असा ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कारधा पोलीस ठाण्यात ठाणेदार श्रीराम लांबाडे रूजू झाले. त्यांनी ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशातच गराडा बुज. येथील नाल्यावर हातभट्टीची दारु काढली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराडे, शंकर चौधरी, देवेंद्र खडसे, विवेक रणदिवे, आकाश सोनुले, गजानन जाधव, रमेश वाघाडे यांनी धाड मारली. त्या ठिकाणी गावठी दारु गाळली जात होती.पोलिसांनी ही हातभट्टी उद्ध्वस्त केली. तेथून ७ प्लास्टीक ड्रम, १०० किलो मोह सडवा, चार मोठे प्लास्टीक ड्रम, त्यात २०० किलो मोह सडवा, १५ मातीचे मडके आणि २० लिटर गावठी दारु जप्त केली. या प्रकरणी आरोपी सुभाष शामराव खंगार (३०) आणि लक्ष्मण कोदूजी खंगार (४५) यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.मटका, जुगार अड्ड्यांवर कारवाई केव्हाकारधा पोलीस ठाणे नव्हे तर भंडारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मटका, जुगार अड्डे सुरू आहे. या अड्ड्यांकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. एकट्या भंडारा शहरात ५० च्या वर मटका जुगार अड्डे सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. परंतु गत सहा महिन्यात कुठेही कारवाई झाली नाही. ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. पोलीस अशा अड्ड्यांवर केव्हा कारवाई करणार?

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा