शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्गखोली बांधकामासाठी शिक्षण विभागाची धावाधाव

By admin | Updated: January 31, 2016 00:29 IST

सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत ेिजल्ह्यात २२ वर्गखोल्यांचे बांधकाम मार्चपूर्वी होणे गरजेचे आहे.

निधी परत जाण्याची भीती : ई-टेंडरिंग अभावी रखडली प्रक्रिया, शिक्षण व बांधकाम विभागाची टोलवाटोलवीप्रशांत देसाई भंडारासर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत ेिजल्ह्यात २२ वर्गखोल्यांचे बांधकाम मार्चपूर्वी होणे गरजेचे आहे. मात्र, बांधकामाचे ई-टेंडरींग झाले नसल्याने सुमारे सव्वा कोटींचा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर प्रकरण शिक्षण विभागाच्या अंगलट येण्याची शक्यता असल्याने त्यांनी निधीच्या मुदतवाढीसाठी धावाधाव सुरू केली आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यामातून जिल्ह्यातील १८ गावांमधील जिल्हा परिषद शाळांना २२ वर्गखोल्या मंजूर झाल्या आहेत. डावी-कडवी योजनेतून या वर्गखोल्या मंजूर झाल्या असून यासाठी १ कोटी १५ लाख १७ हजार रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून सर्व शिक्षा अभियान व शिक्षण विभागाला मार्चपूर्वी सर्व वर्गखोल्या बांधून पूर्ण करणे गरजेचे होते. यासाठी जिल्हा प्रशासनाने २३ नोव्हेंबर २०१५ ला प्रशासकीय मंजूरी दिली. याला तीन महिन्याचा कालावधी लोटला असतानाही शिक्षण विभागाने ई-टेंडरींगच्या प्रक्रियेचे कागदपत्र वेळेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केले नाही. त्यामुळे बांधकामाच्या प्रक्रियेची ई-टेंडरींग अद्याप अपूर्ण आहे. शिक्षण विभागाच्या तुघलकी कारभारामुळे वर्गखोल्या बांधकामाची प्रक्रिया रेंगाळली आहे. बांधकामाला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. निधी खर्च करण्याचा कालावधी दोन महिन्यांचा शिल्लक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आता सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत करण्याची गळ घातली. मात्र त्यांनी नियमावर बोट ठेवून हात वर केले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोलण्यास तयार नाही. यामुळे शिक्षण विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.दोन्ही विभागांचे एकमेकांकडे बोटसार्वजनिक बांधकाम विभागाकडे सन २०१४-१५ चे बांधकाम प्रक्रिया अपूर्ण आहे. त्यामुळे यावर्षीचीही प्रक्रिया रेंगाळल्याचा आरोप शिक्षण विभागाकडून होत आहे. तर शिक्षण विभागाने बांधकामासंदर्भात यावर्षी कुठलाही पत्रव्यवहार बांधकाम विभागाशी केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या दोन्ही विभागाने एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू केला आहे.ई-टेंडरिंगमुळे रखडली प्रक्रियाडावी-कडवी योजनेतून जिल्ह्याला प्रथमच वर्गखोली बांधकामासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यातही तीन लाखांवरील बांधकामाला ई-टेंडरींग लागू करण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाला दोन्हींची अपूरी माहिती त्यांच्या अंगलट येत आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीला लागल्याने त्यात तीन महिन्यांचा कालावधी लोटला हेही एक कारण आहे.