शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य युनिव्हर्सल कारखाना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2015 01:03 IST

तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना कंपनी व्यवस्थापनाने नियमबाह्यपणे सन २००२ मध्ये ८०० कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली.

उद्योगमंत्र्यांकडे तक्रार: जबरदस्तीने ८०० कामगारांना स्वेच्छानिवृत्ती, ३१५ कामगारांना कामावरून काढलेतुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना कंपनी व्यवस्थापनाने नियमबाह्यपणे सन २००२ मध्ये ८०० कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. पुन्हा सन २००६ मध्ये ३१५ कामगारांना नियमबाह्यपणे कामावरून कमी केले, असा आरोप राष्ट्रीय मजदूर मंचने लावला आहे. या कारखान्यात स्थायी व अस्थायी असे दोन हजार कामगार कार्यरत होते. संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणीही केली आहे.सन २००२ मध्ये या कारखान्यावर कोट्यावधीचा वीज बिल थकीत होता. तो थकीत बिल कंपनी व्यवस्थापनाने न भरल्याने वीज मंडळाने कारखान्याची वीज कापली होती. कारखाना बंदवेळी येथे इंटकचे युनियन होते. या संघटनेशी कंपनी व्यवस्थापनाने कोणतीच चर्चा केली नाही. विना चर्चेने कारखान्याने क्लोजड डाऊन करण्याचा निर्णय घेतला. कारखाना प्रशासनाने औद्योगिक विभाग अधिनियम १९४७/२५ के (एफएफए) चे पालन केले नाही. कारखाना प्रशासन बी.आय.एफ.आर. मध्ये जाण्याची गरज होती. कामगार संघटनेत सुद्धा बीआयएफार मंडळाकडे गेली नाही.सन २००२ मध्ये ८०० कामगारांना नियमबाह्य स्वेच्छा निवृत्ती घेण्यास बाध्य करण्यात आले. २००६ मध्ये पुन्हा ३१५ कामगारांना नियमबाह्य घरचा रस्ता कंपनी व्यवस्थापनाने दाखविला. हा कारखाना बंद झाल्याने स्थायी व अस्थायी सुमारे दोन हजार कामगार बेरोजगार झाले. तुमसर शहराच्या आर्थिक निवासावर यामुळे विपरीत परिणाम झाला आहे.या कारखाना परिसरात हजारो टन मॅग्नीजचा साठा पडून आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरात मॅग्नीजचा साठा आहे. या कारखान्या संदर्भात राज्य शासनाने निर्णय करावा. कारखाना पुन्हा सुरू करावा अन्यथा या कारखान्याची विक्री संदर्भात शासनाने दखल घ्यावी. कामगारांना नियमबाह्यपणे स्वेच्छानिवृत्ती होण्यास भाग पाडणे, विज बिलाचा गुंता, कामगारांची देणी शिल्लक आहे ती त्वरीत अदा करण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर मंचचे अध्यक्ष हरीहर मलीक यांनी राज्याच्या उद्योगमंत्र्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)