शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

बोधिचेतीय विहारात वर्षावास अनुष्ठान

By admin | Updated: October 27, 2016 00:33 IST

बोधिचेतीय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एम.आय.डी.सी. खुटसावरी मार्ग स्थित बोधिचेतीय विहारात ...

भंडारा : बोधिचेतीय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एम.आय.डी.सी. खुटसावरी मार्ग स्थित बोधिचेतीय विहारात आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास करीत असलेले बौद्ध - भिक्षु डॉ.भदंत धम्मदीप महाथेरो व भदंत अ‍ॅड. शुभंकर यांचा सोमवार रोजी वर्षावास समापन झाला.वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात अश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात व्यतीत करणे. या काळात भिक्षु विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्षुद्वारा पूर्तता करणे, ध्यान - साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरीत नऊ महिने धम्म - प्रचार - प्रसाराला घालविणे हे भिक्षुंचे कार्य असतात.तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय ब्राम्हण संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्य सत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन मृतदाय वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन माझ्या बहुजन हिताय - बहुजन सुखाय धम्मची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्षु वर्षावास प्रारंभ करतात. यावेळी कालगत बौद्ध भिक्षु नागपथ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या वर्षावास समाप्त प्रसंगी डॉ.भदंत धम्मदीप व भदन्त एड.शुभंकर यांनी मौलिक उद्बोधन केले. या प्रसंगी उपस्थित असलेले बौद्ध - भिक्षु नामे - भदंत सुगत, भदंत आनंद व भदंत सम्यक बोधि, भदंत नागसेन, विनयबोधी. नामांकीत वक्ते विनोद रामटेके, केशव रामटेके, प्रतिभाताई मेश्राम यांनी मौलीक मार्गदर्शन केले. अतिथींच्या रुपात श्रामणेरी धम्मानंदा, गजानन मेश्राम, सेवानिवृत्त तहसीलदार निर्मलाताई उके प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सुषमा वासनिक, चांगुना कांबळे, अर्चना खोब्रागडे, कुंता बारसागडे, धनंजय रामटेके, रक्षिता रुस्तम बोरकर, अमरदीप बोरकर, सविता शेंडे, प्रियंका शेंडे, स्वप्ना वैद्य, मोहन शहारे, मालती गडकरी, सीताराम वासनिक, मारोती करवाडे, विश्वलता मडामे, शुक्रतारा गजभिये, बंडू तिरपुडे, रामकृष्ण कांबळे, दिनेश रामटेके, ज्वाला रंगारी, रत्नमाला वासनिक, रेखा टेंभुर्णे, मनोज वासनिक यांच्यासह बौध्द उपासक- उपासिकांनी विशेष परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)