शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिलिंडरच्या स्फोटात घराचे छप्पर उडाले

By admin | Updated: January 29, 2017 00:46 IST

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे छत उडाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथे

मेंगापूर येथील घटना : समयसूचकतेने जीवितहानी टळली पालांदूर : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे छत उडाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथे घडली. गॅसची गळती झाल्याने व हवेच्या झोताने लाईटर न लावताही विजेच्या बल्ब सुरू करताच स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात घराचे व जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारच्या रात्री मेंगापूर येथील जयदेव बेलखोडे यांच्या घरी घडली. नित्याप्रमाणे जयदेव यांच्या पत्नी माजी सरपंच गुणा बेलखोडे या सायंकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरू करण्याकरीता सिलिंडर्सच्या रेग्युलेटरची बटण फिरविली असता त्यांना गॅस लिक होताना दिसले. त्यामुळे घाबरून त्या घराबाहेर पडल्या. बाहेर अंगणात येताच गॅसचा स्फोट झाला. क्षणार्धात अख्खे घर आगीने कवेत घेतले. आरडाओरड सुरू झाली. पाण्याचा मारा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतू हवेचा झोत प्रवाह अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. स्वयंपाकघरापासून अंगणापर्यंतची सर्व घराची दारे खुली असल्याने व हवेची दिशाही त्याच दिशेने असल्याने घरातील जीवनावश्यक साहित्यानेही पेट घेतला. बाहेर स्वयंपाकघर व त्यांच्यासमोरील खोलीचे छत, कवेलू, फाटे जळून खाक झाले. आग विझविण्याच्या प्रयत्नात सर्वच साहित्याचे नुकसान झाले. घरातील रोख पैसेही जळाले. या आगीत बेलखोडे यांचे सुमारे चार-पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तलाठी पंचनाम्यात १,७५,८०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पंचासमक्ष नमूद करण्यात आले. आठवडाभरापुर्वी गॅस सिलिंडर आणण्यात आला होता तो काल दुपारी सुरू करण्यात आला. २० वर्षापासून गॅस वापरत असून गॅस कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप बेलखोडे कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी प्रशासनाने योग्य ती चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन शक्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बेलखोडे कुटूंबीय दारिद्रय रेषेखालील यादीत असून त्यांच्यावर आलेल्या संकटाने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. हा गॅस हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पाेरेशन या कंपनीचा असून घटनेनंतर या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. निरिक्षणाअंती झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरीता सकारात्मक प्रयत्न करण्याचा शब्द या अधिकाऱ्यांनी बेलखोडे कुटुंबीयांना दिला आहे. (वार्ताहर)