शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नोत्तराच्या तासाने अधिकाºयांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:27 IST

जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा आज बुधवारला सभागृहात घेण्यात आली.

ठळक मुद्देजि.प. सर्वसाधारण सभा : रात्री उशिरापर्यंत पहिला विषय रंगला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा आज बुधवारला सभागृहात घेण्यात आली. या सभेत विषय सुचीनुसार पहिलाच विषय रात्री ७ वाजेपर्यंत रंगला. हा विषय 'प्रश्नोत्तराचा तास' म्हणून ठेवण्यात आला होता. या विषयावर अधिकाºयांची मोठी धावाधाव झाली.जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोकर यांच्या सभाध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेला उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, अर्थ व बांधकाम सभापती विनायक बुरडे, समाजकल्याण सभापती निलकंठ टेकाम, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली.या सभेपूर्वी जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यानुसार सुरूवातीला सदस्यांकडून प्रश्न घेण्यात आले. दिलेल्या प्रश्नांपैकी महत्वाचे प्रश्नांची निवड करून आजच्या सर्वसाधारण सभेत विषयसूचित पहिला विषय प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. दुपारी २ वाजतापासून सुरू झालेली ही सर्वसाधारण सभा रात्री ७ वाजेपर्यंत केवळ विषयसूचितील पहिल्या विषयावरच रंगली.सदस्यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना उपस्थित विभाग प्रमुखांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. अनेक अधिकाºयांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न यावेळी केला. दरम्यान काही सदस्यांनी समयसुचकता दाखवून अधिकाºयांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे. त्यामुळे या सभेत विकासात्मक निर्णय घेण्यात आले नाही. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सभेत कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा झाली ही बाब मात्र गुलदस्त्यात राहली.सभापती-सदस्यांमध्ये खडाजंगीसभागृहात सभा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी यांनी विकासात्मक कामावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी भूमिका मांडली. डहारे यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या रमेश पारधी यांनी डहारेंना खडेबोल सुनावले. यामुळे डहारे यांनीही पारधी यांना उत्तर दिले. यामुळे डहारेविरूद्ध पारधी असा काही क्षण शाब्दिक खडाजंगी सभागृहातील सदस्यांनी अनुभवला.विषयसूचितील पहिल्या विषयानुसार प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. मात्र या तासालाच रात्रीपर्यंत चर्चा सुरू राहीली. आचारसंहिता असल्याने अर्थसंकल्प सादर करता आला नाही.-राजेश डोंगरे, उपाध्यक्ष जि.प. भंडारा