शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

ध्येयसिद्धीसाठी महिलांची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:20 IST

जगामध्ये महिलाकेंद्रित भूमिका ठेऊन विकासाच्या योजना आखल्या न गेल्यामुळे अनेक देशासह आपल्या देशात गरिबी, विषमता, आरोग्याच्या असुविधा व अन्नधान्य विकत घेण्याची क्षमता विकसित न केल्यामुळे पोषणाची गरज वाढत चालली आहेत. पर्यावरणाच्या बदलामुळे त्याची झळ याच घटकावर होते. भविष्यात शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची राहील, असे प्रतिपादन राजीव गांधी बॉयोटेक्नॉलॉजी सेंटरच्या विभागप्रमुख डॉ. आरती शनवारे यांनी केले.

ठळक मुद्देआरती शनवारे : आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत ‘महिलांचा सहभाग’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जगामध्ये महिलाकेंद्रित भूमिका ठेऊन विकासाच्या योजना आखल्या न गेल्यामुळे अनेक देशासह आपल्या देशात गरिबी, विषमता, आरोग्याच्या असुविधा व अन्नधान्य विकत घेण्याची क्षमता विकसित न केल्यामुळे पोषणाची गरज वाढत चालली आहेत. पर्यावरणाच्या बदलामुळे त्याची झळ याच घटकावर होते. भविष्यात शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची राहील, असे प्रतिपादन राजीव गांधी बॉयोटेक्नॉलॉजी सेंटरच्या विभागप्रमुख डॉ. आरती शनवारे यांनी केले.ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराच्या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत व विदर्भ वन विकास संघटना अखिल भारतीय जन वन आंदोलन, ‘ग्लोबल फॉरेस्ट कॉयलेशन व सेंटर फॉर पीपल्स कलेक्टीव्ह’ नागपूरद्वारा शेती आणि वन संवर्धन विकास महिलांचा सहभाग या विषयावर ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, प्रशिक्षण सभागृह भंडारा येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.कार्यशाळेचे अध्यक्ष कॉलेज आॅफ सोशल वर्क कामठीचे प्राचार्य डॉ. रमेश शामकुंवर, प्रमुख पाहुणे डॉ. तृप्ती कल्याशेटी, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा अध्यक्ष अ‍ॅड. संजीव गजभिये सचिव अविल बोरकर, प्रेम शामकुवर नागपूर आदी मान्यवर उपस्थितीत होते.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शनवारे पुढे म्हणाल्या नैसर्गिक संसाधनमध्ये महिलांचे हक्क् व व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या घेतल्या तर विकास आराखडे व अंमलबजावणीच्या कार्यप्रक्रियेत मोठा बदल घडून येऊ शकतो. महिलांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासोबत जैविक तंत्रज्ञानाची जोड दिली तर सहज विकासाचे उद्दिष्टये गाठण्यास वेळ लागणार नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्था जल, जंगल, जमीन, जनावर, या मुल घटकांच्या सहयोगानेच मजबूत होऊ शकतील.डॉ. कल्याणशेटी म्हणाल्या की, महिलांचे आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. त्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढणे ही मोठी धोक्याची चिन्ह आहेत ते ग्रामीण संसाधनाचा योग्य वापर केल्यास या परिस्थितीवर मात करता येऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.डॉ. रमेश शामकुवर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, महिलांनी विकासाच्या प्रक्रियेत महत्वाचे योगदान दिल्याची प्रेरणा घेऊन कार्य करण्याची गरज दर्शविली. अ‍ॅड. गजभिये म्हणाले की, जैव व विधतेच्या संरक्षणाचे नेतृत्व महिलांनी घ्यावे, अशी मांडणी केली तसेच निशांत माटे यांनी जागतिक शाश्वत विकासाचे १७ ध्येय विश्लेषणाची मांडणी केली. अविल बोरकर यांनी सहभागी महिलांच्या गट चर्चा घेऊन आपल्या परिसरातील नैसर्गिक संसाधना आधारित आर्थिक विकासाचे नियोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण मोते यांनी कार्यक्रमाला भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील ९० महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्र्रदर्शन गौतम नितनवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. सविता चवंडे कामठी, चेतना बोरकर, सचिन बोंद्रे, सागर बागडे यांचे योगदान राहिले.