शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रोवणी झाली, आता पाणी कुठून आणायचे?

By admin | Updated: August 11, 2016 00:22 IST

मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला कंटाळून शेतकरी शेती करीत आहे.

भारनियमन बंद करा : शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना सवालसंजय साठवणे साकोलीमागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला कंटाळून शेतकरी शेती करीत आहे. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी परिस्थिती सुधारेल. मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर कधी निसर्ग तर कधी शासन पाणी फेरते. पाऊस अत्यल्प बरसला. उशिरा का होईना शेतकऱ्यांनी जमेल तशी रोवणी पूर्ण केली. मात्र आता पुन्हा पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे धानाला लागणारे पाणी कसे आणायचे व १६ तासांच्या भारनियमनामुळे शेती कशी पिकवायची हा खरा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भारनियमन बंद करण्याचा एल्गार पुकारला आहे.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्वत जुना तालुका म्हणून साकोली तालुक्याची नोंद आहे. मात्र राजकीय डावपेच व लोकप्रतिनिधींची उदासिनता यामुळे साकोली तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहिला. याचे साधे उदाहरण म्हणजे तालुक्यातील तीन मोठे सिंचन प्रकल्प आजही अपुर्णावस्थेत आहेत. एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकात प्रकल्प पूर्ण करणाऱ्यासंदर्भात आश्वासनाची खैरात वाटली जाते. मात्र निवडून येताच या प्रकल्पाचा विसर पडतो. सद्यस्थितीला तिनही प्रकल्पात संपूर्ण तालुक्याची शेती पिकेल एवढे पाणी जमा झाले आहे. मात्र प्रकल्पाचे कामच अपूर्ण आहे. त्यामुळे हे पाणी ना तलावात सोडता येत ना शेतीला देता येत. ही तालुक्यातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.यावर्षीही सुरुवातीपासूनच पाऊस मध्यम स्वरुपाचा येत आहे. त्यामुळे बरीच रोवणी उशिराने झाली. पावसाअभावी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. मात्र जसे जमेल तसे शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. कारण सिंचनाची अपुरी सोय तर दुसरीकडे ज्यांच्याजवळ विहिरी व बोअरवेल आहेत त्यांना भारनियमनाचा फटका. २४ तासातून फक्त ८ तास वीज प्रवाह सुरु राहतो व उर्वरीत १६ तासांचे भारनियमन. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी शेती पिकवायची तरी कशी हाही प्रश्नच आहे. या भारनियमनामुळे आताही साकोली तालुक्यात रोवणी सुरु आहे. उशिरा रोवणीमुळे नक्कीच उत्पन्नात फरक पडणार आहे. १६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात वीज वितरण कंपनीला निवेदन दिले होते. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जि.प. सदस्य अशोक कापगते, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर, माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, नरेंद्र वाडीभस्मे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी तीन दिवसात काहीतरी व्यवस्था करू असे आश्वासन दिले. मात्र अजूनपर्यंत तरी भारनियमनाचा बदल करण्यात आला नाही. त्यामुळे आताही कृषीपंपांना फक्त ८ तासच वीज पुरवठा मिळत आहे.सिंचन प्रकल्प रखडलेले रोवणी झाली. पावसाचा पत्ता नाही. आता शेतीसाठी पावसाची गरज आहे. सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. भारनियमनामुळे विहिरी व बोअरवेलचे पाणीही देता येत नाही. त्यामुळे शेतीला पाणाी आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.आश्वासनही फोल ठरलेशेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या वेळी वीज वितरण कंपनीने भारनियमनात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अजून झाली नाही. शेतकऱ्याची आत्महत्यासततच्या नापिकीला व यावर्षीची परिस्थिती पाहून पुन्हा याहीवर्षी नापिकीचा सामना करावा लागेल. या भीतीपायी सातलवाडा येथील शेतकरी हौसीलाल बिसेन यांनी याच महिन्यात विष घेऊन आत्महत्या केली. तरी शासनाला जाग आली नाही.शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन तात्काळ भंडारा व मुंबई येथे पाठविण्यात आले. मात्र मुंबईवरून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भारनियमनासंबंधी कुठलाही नवा आदेश आले नाही. त्यामुळे १६ तासांचेच भारनियमन सुरु आहे.- आर.के. घाटोळे, कार्यकारी अभियंताज्या विदर्भात सर्वात जास्त वीज तयार होते त्याच विदर्भात कृषीपंपाचे भारनियमन सुरु आहे. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे शासन होते. त्यावेळी पावसाळ्यात कधीच भारनियमन करण्यात आले नाही. त्यामुळे हेच का अच्छे दिन असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करायची असेल तर शासनाचे तात्काळ भारनियमन बंद करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.- सुनिल फुंडे, अध्यक्ष मध्यवर्ती बँक, भंडारा.