शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामावर सुविधांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासन प्रशासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामे सुरु आहेत. त्या कामावरील मजुरांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाने निधिची तात्काळ तरतुद करावी अशी मागणी सितेपार ग्रामपंचायतच्या सरपंचा मंजूषा मार्कंड झंजाळ यांनी केली आहे.शासन प्रशसनाच्यावतीने मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबतचे लोकमान्य धोरण असुन या मार्फत ...

ठळक मुद्देझंजाळ : माजी मालगुजारी तलावांचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासन प्रशासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामे सुरु आहेत. त्या कामावरील मजुरांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाने निधिची तात्काळ तरतुद करावी अशी मागणी सितेपार ग्रामपंचायतच्या सरपंचा मंजूषा मार्कंड झंजाळ यांनी केली आहे.शासन प्रशसनाच्यावतीने मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबतचे लोकमान्य धोरण असुन या मार्फत ग्राम विकासाची कामे केली जातत. सध्या तलावाचे खोलीकरण, भातखचरे, पांदन रस्ते अशा प्रकारचे विविध कामे ग्रामपचांयतच्या मार्फत केली जातात. परंतू या कामावरील मजुरांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष निधीची तरतुद करण्यात आली नसल्यामुळे या कामावरील मजुरांना शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या सितेपार येथे मामातलाव खोलीकरणाचे काम सुरु असून मजूरांना उन्हाच्या तडाख्यात माती खोदण्याचे काम करावे लागते. त्यामुळे काही मजुरांना उष्माघाताला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिण्याचे पाणी व आरोग्य विषयक बाबींची व्यवस्था करणे गरजेचे असले तरी सदर व्यवस्थेसाठी संबंधित विभागाकडून विशेष निधी प्राप्त झाला नसल्यामुळे रोहयोच्या कामावर व्यवस्था करण्यासाठी तारांबळ उडत आहे.त्यामुळे सितेपार (झं.) येथील रोहयोच्या कामावरील मजूरांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागाने मजुरांना विश्रांतीसाठी नेट शेड, पिण्याचे पाणी, त्यांच्या मजुरांची प्रकृती बिघडल्यास फिरते आरोग्य मोबाईल व पथक, ओआरएस ग्लुकोज पावडर तसेच प्राथमिक उपचाराच्या साधनाची व्यवस्था करण्यासाठी संबंधीत विभागाने तात्काळ निधीची तरतुदकरुन निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी सरपंचा मंजूषा झंजाळ यांनी केली आहे.