शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रोहयोतून मैदानाचा विकास

By admin | Updated: May 18, 2014 23:23 IST

ग्राम प्रशासनाच्या निर्णय क्षमतेतून इच्छाशक्तीतून चांगले फलित कसे पाहावयास मिळतात, त्यातून गावाचा विकास व मजुरांना रोजगार कसा दिला जाऊ शकतो

 करडी (पालोरा) : ग्राम प्रशासनाच्या निर्णय क्षमतेतून इच्छाशक्तीतून चांगले फलित कसे पाहावयास मिळतात, त्यातून गावाचा विकास व मजुरांना रोजगार कसा दिला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून मोहाडी तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीकडे पाहिले जात आहे. सदर ग्रामपंचायतीने रोहयो योजनेतून तलावातील गाळ काढला, शेतावर टाकला, सोबतच शाळेचा मैदान तयार केला. सौंदर्यीकरणासाठी जागा तयार केली. त्यातूनच गावातील ३५० मजुरांना रोजगार मिळाला. महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना गावासाठी वरदान ठरली आहे. या योजनेमुळे मागेल त्याला काम व कामानुसार दाम दिले जाते. कामाची १०० टक्के हमी मिळत असल्याने मजुरांचे पलायन तर थांबेलच शिवाय गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. या योजनेचे स्वरुप व कामे बदलत्या काळानुरुप बदलले आहे. अनेक विकास कामांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. मात्र अजूनही लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे गावे विकासापासून वंचित आहेत. कमिशन मिळणारी कामे करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. त्यासाठी झगडे करण्यासही त्यांना काही एक वाटत नाही. मोहाडी तालुक्यातील मुंढरी परिसराचा विकाससुद्धा अशाच उपद््व्यापामुळे खुंटला. मात्र ग्राम प्रशासन जागृत असल्यास गावाचा विकास व लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात दिला जाऊ शकतो. या दृष्टीने आज खडकी ग्रामप्रशासनाकडे पाहिले जात आहे. सन २०१४ वर्षात खडकी ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेंतर्गत तलावातील गाळ काढण्याचे काम नुकतेच हाती घेतले. कामावर ३५० मजुरांनी उपस्थिती दर्शविली. कामे जोमाने सुरू आहेत. तलावातून काढलेला सेंद्रिय खताचा गाळ शेतकर्‍यांच्या शेतात त्यांच्या मागणीनुसार घातला गेला. त्यानंतर जि.प. पूर्व माध्यमिक शाळेच्या मैदानाच्या विकासाचा आराखडा आखला गेला. शाळेसमोरचा, रस्त्याला लागून खोलगट भाग होता. नेहमी पुराचे पाणी त्यात साचायचे. शाळेमागूून नाला वाहत असल्याने मुलांसाठी पालकांच्या मनात भीती असायची. सरपंच असुराज वरकडे, उपसरपंच शर्मा बोंदरे, ग्रामसेवक अश्विन डोहळे, ग्रामरोजगार सेवक श्रीकृष्ण वरकडे यांनी सर्वप्रथम गाळ टाकून मैदान सपाटीकरणाचे काम हाती घेतले. ट्रॅक्टरच्या माध्यमातून माती घालून मैदानाचे सपाटीकरण केले गेले. शाळेच्या मागून नाल्याला पाळ घातली गेली. त्यामुळे पुराचे पाणी शाळेत येण्याचा मार्ग बंद झाला आहे. तयार झालेल्या मैदानाचा उपयोग सौंदर्यीकरणासाठी करण्याचा ग्रामप्रशासनाचा मानस आहे. मैदानाच्या सपाटीकणरणासाठी लोकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे निधीची मागणी केली. मात्र प्रत्येकवेळी लोकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष केल्या गेले. रोहयो कामातून लोकांना काम व पैसा तर मिळालाच शिवाय गावाच्या हिताचा प्रश्नसुुद्धा मार्गी लागल्याचे समाधान नागरिकांत पहावयास मिळत आहे. यासाठी तांत्रिक पॅनल अधिकारी महेश निमजे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप वाढवे, बोधानंद बागडे, योगेश्वर वरकडे, शामलाल कातोरे, बायाबाई वरकडे, कमलाबाई सूर्यवंशी, सरिता घरडे, यांचीसुद्धा मोलाची साथ लाभली. रोहयो अंतर्गत मजुरांना कामे कमी पडू नयेत म्हणून नाला सरळीकरणाचे कामेसुद्धा हाती घेतले गेले. त्यावर ४२५ मजुरांना काम मिळाला. कामाचे भूमिपूजन कृषी तांत्रिक पॅनल अधिकारी अनिल ठवकर यांचे हस्ते झाले. (वार्ताहर)