शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोचे काम आता ७ वाजतापासून

By admin | Updated: May 23, 2015 01:06 IST

तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्या तापमानाचा प्रभाव काम करणाऱ्या मजूरांवर पडू नये यासाठी आता रोजगार हमी योजनेच्या कामाची वेळा बदलविण्यात आली.

मोहाडी : तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्या तापमानाचा प्रभाव काम करणाऱ्या मजूरांवर पडू नये यासाठी आता रोजगार हमी योजनेच्या कामाची वेळा बदलविण्यात आली. आता सकाळी ७ वाजता व दुपारी ३ वाजता मजुरांना कामावर जावे लागणार आहे.सद्यस्थितील मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेचे काम सुरु आहेत. भर उन्हात काम सुरु असल्याने मजूरांच्या जिवाची लाहीलाही होते हे लक्षात घेवून मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती उपेश बांते यांनी रोजगार हमी योजनेच्या कामाची वेळा बदलवून घेण्यासंबंधी आढावा बैठकीच्या पूर्वी सूचना केली होती. त्या सुचनेला अंतीम रुप देण्यात आले आहे. त्यामुळे आता सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ वाजतापर्यंत उन्हात तापणारा मजूर कामावर सकाळी ७ वाजता कामावर जातील आणि ११ वाजता घरी परत येतील. त्यानंतर दुपारी ३ ते ६ वाजतापर्यंत काम करणार आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या वेळा बदलवून घेणारी मोहाडी पंचायत समिती जिल्ह्यात पहिली पंचायत समिती ठरली आहे. (तालुका प्रतिनिधी)रोहयोच्या कामात गोंधळप्रत्येक मजुरांच्या हाताला काम मिळावे अशी शासनाची धारणा आहे. पण काम करुनही दाम मिळत नसल्याचा तक्रारी उजेडात येत आहेत. गुरुवारच्या दिवशी आंधळगाव या गावच्या मजूरांनी पंचायत समितीमध्ये हल्लाबोल केला. कामावर मजूरी कशी मिळणार याची शंका असणाऱ्या तीस-चाळीस मजूरांनी पंचायत समिती उपसभापती उपेश बांते यांच्या कक्षात धडक दिली. शासनाच्या नव्या निर्णयानुसार मजूरांना कामावर जाण्यासाठी व कामाची मागणी करण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरांच्या आधारकार्डाची नोंदणी करणे सुरु आहे. यात आधारकार्डाची नोंदणी करणारे काळजी पुर्वक काम करीत नसल्याने मजूरांना कामावर जावूनही मजूरीपासून वंचित व्हावे लागत आहे. आंधळगाव येथील मजूर कामावर जावूनही त्याचे नाव यादीत नसल्याने न्यायासाठी भरउन्हात पंचायत समिती गाढले होते. अधिकारी तांत्रिक अडचण समोर करुन मजूरांची दिशाभूल करीत आहेत.मजूर कामावर जावूनही त्यांच्या कामाचा हक्क व मजूरी यापासून दूर नेत आहेत. मोहाडी तालुक्यात असा गोंधळ सुरु असल्याने मजूरांना त्रास सहन करावे लागत आहे. रोजगार हमी योजनेच्या पंचायत समितीच्या विभागाची कार्यप्रणाली ठेपाळली आहे. मजूर कामावर गेला त्याला हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत. ही भूमिका व सहकार्याची भावना ठेवली जात नाही. कार्यालयाच्या तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करुन कामावर गेलेल्या मजुरांना रोजगार सेवक घराकडे हुसकावून लावण्याचे प्रमाण वाढले आहे. तांत्रिक अडचणी कार्यालयाच्या आहेत. मजूरांचा नाहीत. मजूरांनी केलेल्या कामाचा दाम मिळावा हीच अपेक्षा असते. पण तांत्रिक कारणमुळे आपणही हतबल आहोत असे बोलून कार्यालयीन अधिकारी आपले हात वर करीत आहेत. तथापि, उपसभापती उपेश बांते यांनी पुढाकार घेऊन त्या १८० मजूरांचे मस्टर काढले. त्यामुळे ते मजूर आजपासून पूर्ववत कामावर जाणार आहेत.