शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोवर गाजली मोहाडीची आमसभा

By admin | Updated: February 28, 2015 00:49 IST

पंचायत समिती मोहाडीची आमसभा रोजगार हमी योजना शालेय पोषण आहार मुद्यावर चांगलीच गाजली तर विहीरगाव येथील रोजगार सेवकाच्या नियुक्तीवरून चांगलाच गदारोळ झाला.

मोहाडी : पंचायत समिती मोहाडीची आमसभा रोजगार हमी योजना शालेय पोषण आहार मुद्यावर चांगलीच गाजली तर विहीरगाव येथील रोजगार सेवकाच्या नियुक्तीवरून चांगलाच गदारोळ झाला. उपस्थित सरपंच, उपसरपंचानी अधिकारी, कर्मचाऱ्यावर प्रश्नांचा भडीपार केला. यामुळे आमदार चरण वाघमारे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. आमसभा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती.आमसभेला पंचायत समिती सभापती विणा झंझाड, उपसभापती उपेश बांते, तहसिलदार हरीभाऊ थोटे, गटविकास अधिकारी, दिलीप आगलावे, जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, रंजना उके, भोजराम पारधी, भाऊराव तुमसरे, केशव बांते, अनेक विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, तसेच सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. मोहाडी पंचायत समितीची आमसभा आमदार चरण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात अनेक सरपंच, उपसरपंचांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची मजुरी तालुका स्तरावरील डाटा आॅपरेटरच्या चुकीमुळे मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या विषयावर चांगलीच चर्चा रंगली. मजुरांचे बँक खाते क्रमांक चुकीचे घातल्याने एका गावातील मजुरांची मजुरी दुसऱ्याच गावच्या बँकेत जमा झाली तर काही मजुर कामावर गेले नसतानाही त्यांच्या बँक खात्यात मजुरी जमा झाल्याने ती त्यांनी काढून टाकली. या घोटाळ्यामुळे रोहयोच्या अनेक मजुरांना अद्यापर्यंत मजुरी मिळालेली नाही. या विषयावर गटविकास अधिकारी, समन्वय अधिकारी यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. आमदार वाघमारे यांनी तालुका स्तरारील डाटा आॅपरेटरना कामात हयगय केल्याप्रकरणी बर्खास्त करावे, असा ठराव मांडला तर रोहयो अंतर्गत तयार करण्यात आलेला रस्ता एका शेतकऱ्याने जेसीबी लावून फोडला त्यावर एफआयआर दाखल करण्याचे सुचविण्यात आले. सालई खुर्द येथील कुशल कामाच्या निविदाच काढण्यात आल्या नाहीत. ग्रामसेवक गायधने यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनात आल्यावर आमदारांनी त्या ग्रामसेवकाला चांगलेच खडसावले तसेच त्यांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निदेश दिलेत. शालेय पोषण आहारात अनेक शाळांना निकृष्ठ दर्ज्याचा धान्यपुरवठा केला जातो. करारानुसार उत्तम प्रकारचे धान्य पुरवठा करण्याचे निर्देश आहेत. मुख्याध्यापकांनी व शालेय समिती अध्यक्षांनी धान्य तपासूनच घ्यावे असे निर्देश दिले. (शहर प्रतिनिधी)