शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोहगावातील रोहयो कामे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:53 IST

तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असणाऱ्या मोहगाव (खदान) गावात रोहयो अंतर्गत शेतशिवारात करण्यात आलेली कामे अव्वल असल्याची पावती कृषी विभागाचे पथकाने दिली आहे. या गावात मजुरांना कामे उपलब्ध करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या पथकाने केली पाहणी : भात खाचरे, मजगीच्या कामांचा समावेश, अधिकारी समाधानी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असणाऱ्या मोहगाव (खदान) गावात रोहयो अंतर्गत शेतशिवारात करण्यात आलेली कामे अव्वल असल्याची पावती कृषी विभागाचे पथकाने दिली आहे. या गावात मजुरांना कामे उपलब्ध करण्यात आलेली आहे.दीड हजार लोकवस्तीच्या मोहगाव (खदान) गावात कृषी विभागाचे वतीने शेतकऱ्याचे शेत शिवारात रोहयो अंतर्गत भातखाचरे, मजगीचे कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात ७ हेक्टर आर हून अधिक क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे. मजुरांना कामे उपलब्ध करणारी योजना म्हणून या योजनेकडे बघितले जात आहे. परंतु अलीकडे या योजनेत जेसीबी मशीनचा उपयोग वाढला आहे. यामुळे मजुरांचे हातातून कामे निसटली जात आहे. परिसरात रोहयो कामाचा दुष्काळ असताना मोहगाव (खदान) गावात नियोजनबद्ध रितीने मजुरांचे हाताला कामे उपलब्ध २कण्यात आली आहे. कृषी विभाग आणि पाणलोट समिती यांचे संयुक्त निदर्शनात करण्यात येणाºया रोहयो कामावर सरपंच उमेश कटरे यांनी नियंत्रण ठेवले आहे. या गावात भातखाचरे आणि मजगीचे कामे प्रलंबित होती. या योजनेअंतर्गत कामे पूर्ण करण्यात आली आहे. मजुरांचे हाताने या गावात करण्यात आलेली कामे लक्ष वेधत आहेत. ७ हेक्टरहून अधिक क्षेत्रात करण्यात आलेल्या कामाची पाहणी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड आणि तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके, पारधी, ठाकरे, वळवी व फासे यांचे पथकाने केली आहे. या पथकाने पानलोट समिती तथा कृषी विभागाचे कार्यावर समाधान व्यक्त केले आहे. मजुरांचे मार्फत करण्यात आलेली कामे योग्य पद्धतीने होत असल्याचे शेतकरी आनंदीत झाले आहे.या गावात उर्वरीत शेतीचे रोहयो अंतर्गत पुन्हा भातखाचरे व मजगीचे कामे केली जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके यांनी सांगितले. या शिवाय योजनेत जलद गतीने निधी उपलब्ध केल्यास कामांना गती दिली जाईल. परंतु निधी अभावी योजना प्रभावित ठरत असल्याचे सरपंच उमेश कटरे यांनी सांगितले.