शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

३५.८१ कोटीतून साकारणार ६४.४८ कि.मी.चे रस्ते

By admin | Updated: April 9, 2016 00:24 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : सातही तालुक्यांचा योजनेत समावेशदेवानंद नंदेश्वर भंडारामुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ३५.८१ कोटी रुपये खर्चून ६४.४८ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली होती. या योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये राज्यभरात २ हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट होते.या योजनेत २०१५-१६ मध्ये प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले. मात्र, योजनेला उशीरा सुरुवात झाली. राज्य शासनाकडूनही निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला निधीची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा सोमवारला ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे लाभदायक ठरली आहे. जिल्ह्यातील १० रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधानमंत्री /मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी रस्त्याच्या दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करुनच कार्यारंभाचे आदेश द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. सदर रस्त्यांसाठी लागणारी जमीन कुठल्या विभागाच्या ताब्यात आहे, याची खात्री करावी करावी लागेल.देखभाल दुरुस्तीसाठी २.४९ कोटीसातही तालुक्यातील एकूण ६४.४८ किलोमिटरच्या लांबीच्या रस्त्याला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असताना या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी २.४९ कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद रस्तानिहाय तालुकास्तरावर करण्यात आली. लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.बोरी, जांभोरा, एलकाझरीसाठी सर्वाधिक निधीभंडारा, लाखनी, साकोली तालुक्यातील दोन रस्ते व अन्य चार तालुक्यातील प्रत्येकी एक रस्त्याच्या कामाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. यात मोहाडी तालुक्यातील बोरी-जांभोरा-एलकाझरी-केसलवाडा या १०.४३ किलोमिटर रस्त्यासाठी ६.४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सर्वात कमी निधी लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, खैरी, राजेगाव या १.४० किलोमीटर रस्त्यासाठी ७६.०१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.सातही तालुक्यातील रस्त्यांचा समावेशभंडारा तालुक्यातील गुंथारा ते खुटसावरी या ६.५० कि़मी. रस्त्यासाठी ३२३.६७ लाख, दवडीपार ते गराडा (बु.) या ५.७० कि़मी.साठी ३२२.३५ लाख, लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, खैरी, राजेगाव या १.४० कि़मी.रस्त्यासाठी ७६.०१ लाख, कनेरी ते केसलवाडा-रेंगोळा या ६ कि़मी. रस्त्यासाठी ३१७.४९ लाख, साकोली तालुक्यातील मोहघाटा- कुंभली या ५.८० कि़मी. रस्त्यासाठी ३१६.०१ लाख, चारगाव-परसोडी १.७० कि़मी.साठी ९२.९१ लाख, तुमसर तालुक्यातील डोगरला ते येरली, झारली पिपरा या १०.२५ कि़मी.साखळी रस्त्यासाठी ५०९.८४ लाख, मोहाडी तालुक्यातील बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा या १०.४३ कि़मी. रस्त्यासाठी ६४५.३२ लाख, पवनी तालुक्यातील सिंगोरी-रोहना-सेलोरी या १०.२० कि़मी.साठी ६०७.१६ लाख आणि लाखांदूर तालुक्यातील परसोडी, भागडी, मांढळ या ६.५० कि़मी. रस्त्यासाठी ३७०.३७ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.