शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

३२ कोटीतून साकारणार ५८ कि.मी.चे रस्ते

By admin | Updated: September 30, 2016 00:39 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१६-१७

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : सातही तालुक्यांचा योजनेत समावेशदेवानंद नंदेश्वर भंडारामुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात बॅच १ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ३१.२३ कोटी रुपये खर्चून ५७.८३ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.भंडारा जिल्ह्यातील ९ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात सातही तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील श्रीनगर ते बोरगाव या ८.७० किमी. रस्त्यासाठी ३५८.५२ लाख, तुमसर तालुक्यातील सिंदपुरी ते गोंदेखारी महालगाव या ७.०९ किमी. रस्त्यासाठी ४८६.४२ लाख, मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव- धर्मापुरी- भिकारखेडा- टांगा- उसर्रा या १०.५२ किमी. रस्त्यासाठी ५११.७१ लाख, पवनी तालुक्यातील कोंढा- सेंद्री (बुज.) राज्य मार्गपर्यत या ७.८३ कि.मी. रस्त्यासाठी ३८९.१७ लाख, लाखांदूर तालुक्यातील परसोडी- भागडी- मांढळ- सरांडी- मासळ या ९.३० किमी. रस्त्यासाठी ५३९.५५ लाख, लाखनी तालुक्यातील कनेरी ते केसलवाडा- रेंगोळा- मांगली- किटाळी या ५ कि.मी.साठी २४९.८७ लाख, मांगली ते मचारणा मुरमाडी (हमेशा) या ३.६ किमी. रस्त्यासाठी १६१.१७ लाख, साकोली तालुक्यातील राज्यमार्ग ते चारगाव परसोडी उमरी या २.१९ किमी. रस्त्यासाठी १५८.२६ लाख आणि पळसगाव- चिचटोला- बोळदे- सालई या ४.१४ किमी. रस्त्यासाठी २६८.९६ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी रस्त्याच्या दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करुनच कायार्रंभाचे आदेश द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. सदर रस्त्यांसाठी लागणारी जमीन कुठल्या विभागाच्या ताब्यात आहे, याची खात्री करावी करावी लागेल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निधीतून होणाऱ्या या बांधकामामुळे रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जाणार आहे.देखभाल दुरुस्तीसाठी २.१७ कोटीसातही तालुक्यातील एकूण ५७.८३ किलोमीटरच्या लांबीच्या रस्त्याला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असताना या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी २.१७ कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद रस्तानिहाय तालुकास्तरावर करण्यात आली. परसोडी-मासळसाठी सर्वाधिक निधीलाखनी, साकोली तालुक्यातील दोन रस्ते व अन्य चार तालुक्यातील प्रत्येकी एक रस्त्याच्या कामाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. यात सर्वाधिक निधी लाखांदूर तालुक्यातील परसोडी-भागडी-मांढळ- सरांडी-मासळ या ९.३० किलोमिटर रस्त्यासाठी ५.३९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सर्वात कमी निधी साकोली तालुक्यातील चारगाव - परसोडी - उमरी या २.१९ किलोमीटर रस्त्यासाठी १.५८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.