लोकमत न्यूज नेटवर्कजांब ( लोहारा ) : जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळ गायमुख कडे जाणारा जांब ते लोहारा, गायमुख मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून गिट्टी बाहेर निघाली आहे. रस्ता पुर्णपणे खड्डेमय असून या रस्त्यानी प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या गायमुख तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळ याठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. गायमुखला जाणारा रस्ता जांब ते गायमुख हा आजच्या स्थितीत खड्डेमय बनला आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गिट्टी बाहेर निघाल्याने या रस्त्यांनी जाण्या येण्याकरिता या परिसरातील जनतेला विद्यार्थ्यांना भाविक भक्तांना पर्यटकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. महाशिवरात्रीला गायमुख ला मोठा यात्रा भरत असते.हा रस्ता दरवर्षी महाशिवरात्रीच्या तोंडावर रस्त्याची लाखो रुपये खर्च करुन थातुरमातुर दुरुस्ती केली जाते. यात्रा संपली की या रस्त्याची स्थिती जैसे थे होत असते. याकडे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची तक्रार परिसरातील जनतेनी केली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला असून त्याला नाबाड बँकेची प्रशासकीय मंजुरी थांबली असल्याची माहिती आहे.शासनाने याकडे लक्ष देऊन जांब ते लोहारा व गायमुख रस्त्याचे बांधकाम सुरु करावे, अशी मागणी लोहारा तसेच गायमुख, सोरणा परिसरातील जनतेनी केली आहे. या रस्त्याचे काम त्वरीत सुरु झालो नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा परीसरातील जनतेनी दिला आहे.
जांब ते गायमुख रस्ता खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गिट्टी बाहेर निघाल्याने या रस्त्यांनी जाण्या येण्याकरिता या परिसरातील जनतेला विद्यार्थ्यांना भाविक भक्तांना पर्यटकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. महाशिवरात्रीला गायमुख ला मोठा यात्रा भरत असते. हा रस्ता दरवर्षी महाशिवरात्रीच्या तोंडावर रस्त्याची लाखो रुपये खर्च करुन थातुरमातुर दुरुस्ती केली जाते.
जांब ते गायमुख रस्ता खड्डेमय
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : रस्ता मंजूर तरीही बांधकामास विलंब