शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या जागेत रस्ता बांधकामाचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:47 IST

तुमसर वनपरिक्षेत्रांंतर्गत सौदेपूर ते खैरटोला दरम्यान मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ६ कि़मी. रस्ता तयार करण्यात येत असून वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसोदेपूर-खैरीटोला मार्ग : मुख्यमंत्री सडक योजनेचे काम, कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : तुमसर वनपरिक्षेत्रांंतर्गत सौदेपूर ते खैरटोला दरम्यान मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ६ कि़मी. रस्ता तयार करण्यात येत असून वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. तत्पूर्वी वनपरिक्षेत्राधिकारी यांनी येथे काम बंद केले होते. नंतर काम सुरू करण्यात आले. त्यानंतर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हे विशेष.तुमसर तालुक्यातील सोदेपूर-खैरीटोला दरम्यान ६ कि़मी. लांबीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात येत आहे. येथे कंत्राटदाराला साडे सात मीअर रूंदीमध्ये रस्ता तयार करायचा होता. मात्र कंत्राटदाराने वनविभागाच्या हद्दीतील जागेत रस्ता तयार करत खोदकाम केला आहे.याची माहिती प्राप्त होताच तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी माहिती प्राप्त होताच मोक्का चौकशी करून संबंधित कंत्राटदाराविरूद्ध वनअधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.सध्या काम बंद करण्याचे आदेशही वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कंत्राटदाराला दिले. घनदाट जंगलातून हा रस्ता जातो. रस्ता तयार करण्यापूर्वी संबंधित विभाग प्रत्यक्ष देखरेख करून त्यार नियंत्रण ठेऊन कामे पार पाडतात. येथे तसे झाल्याचे दिसत नाही.मुख्यमंत्री सडक योजनेचे स्वतंत्र कार्यालय, भंडारा येथे जिल्हा मुख्यालयी आहे. त्या विभागाचे कनिष्ठ बांधकाम अभियंता येथे कामे पाहतात. जिल्हास्तरावर वरिष्ठ अधिकारी आहेत. सुमारे अडीच कोटींचे हे संपूर्ण कामे असल्याची माहिती आहे. रस्ता ही ग्रामीण जीवनाची लाईफ लाईन आहे. रस्त्याची कामे सुरू केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी मोक्यावर गेले होते. तीन दिवसापुर्वी प्रकरण अंगलट येईल म्हणून तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पुन्हा चौकशी करीता मोक्यावर गेले होते. मंगळवारी त्यांनी काम बंद करण्याचे निर्देश देऊन संबंधित कंत्राटदाराविरूद्ध वनअधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. ही तत्परता रस्ता बांधकाम सुरू करण्यापूर्वी कां दाखविली नाही हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. जंगलातून रस्ता तयार करतानी वनविभागाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. वनविभागाजवळ कर्मचाºयांची फौज आहे हे विशेष. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास अनियमितता समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता बांधकामानंतर येथे वन विभागाला जाग आली. कर्तव्यात कसूर प्रकरण शेकण्याची येथे शक्यता आहे.सोदेपूर-खैरीटोला रस्ता बांधकाम प्रकरणी वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्याचे प्रथमदर्शनी आढळले. याप्रकरणी मोका चौकशी केल्यानंतर संबंधित मंत्राटदाराल काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तथा कंत्राटदारावर भारतीय वनअधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल.-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्रअधिकारी तुमसर.