पवनी : पवनी तालुक्यातील शिवनाळा (चौ.) ते आसगाव रस्त्याचे दीड कि.मी. लांबी रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण विशेष फंडातून सुरु आहे. हे काम अंदाजे १५ लक्ष रुपये किमतीचे आहे. मात्र, करण्यात येत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे.बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना हाताशी धरून या बांधकामामध्ये खडी तसेच मुरुमाचा वापर हा अत्यल्प आहे. सदर बांधकाम सुरु असताना उखळणे सुरु झाल्यामुळे शासनाच्या फंडाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुरुपयोग होत आहे. बांधकाम त्वरीत थांबवून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.शिवनाळा (चौ.) ते आसगाव रस्ता कामाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या हस्ते दोन महिन्या अगोदर झाले. कामाला प्रत्यक्षात सुरुवात मागील आठवड्यात झालेले असून सुरुवातीपासूनच या कामामध्ये साहित्याचा वापर हा अत्यंत सुमार दर्जाचा असल्यामुळे गावकऱ्यांनी या कामाला विरोधसुद्धा केला. ठेकेदारांने गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता विभागातील कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता यांना हाताशी धरून काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अधिक वेगळे परंतु तरीही निकृष्ट असे काम सुरुच ठेवलेले आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळेच ठेकेदार निर्ठावलेले आहेत. त्यांच्या कामांची त्वरीत चौकशी होणे गरजेचे आहे. हातमिळवणीमुळे अशाच वृत्तीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदर काम त्वरित बंद करून कामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मगणी उपजिल्हाध्यक्ष धनंजय धुळसे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By admin | Updated: March 19, 2015 00:32 IST