शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रस्त्याचे बांधकाम पाडले बंद

By admin | Updated: May 27, 2014 00:35 IST

खडकी-पालोरा तीन कि.मी. लांबीचा रस्ता राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेला असताना परवानगी न घेता जि.प. बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम अवैधपणे सुरू केले.

करडी (पालोरा) : खडकी-पालोरा तीन कि.मी. लांबीचा रस्ता राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेला असताना परवानगी न घेता जि.प. बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम अवैधपणे सुरू केले. जि.प. सदस्यानेसुद्धा आपले मरगळलेले राजकारण चमकविण्याचा प्रयत्न यातून केला. अधिकारात नसलेल्या रस्त्याचे कैवारी आपणच आहोत, असे भासवून जनतेची फसवणूक केली. राज्य बांधकाम विभागाने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. खड्डे बुजविण्याचे काम बंद करण्यात सांगितले. रस्त्याच्या मुद्यावर जि.प. सदस्याची फजिती झाल्याची, रस्त्यावरच ते तोंडघशी पडल्याची चर्चा परिसरात आहे.

सुरूवातीच्या काळापासून खडकी-पालोरा रस्ता जि.प. बांधकाम विभागाच्या अधिकारात होता. जि.प. सदस्य बाबू ठवकर यांचे कार्यकाळात रस्त्याच्या दुरवस्थेला सुरूवात झाली. रस्त्यावर आडव्या नाल्या, खोल खड्डे पडले, कारपेट उखडले मात्र लिपापोती करण्याची कामे ठवकर यांच्या कार्यकाळात झाली. दोनदा पॅचेसची निकृष्ट कामे केली गेली. त्याचाच परिणाम म्हणून बांधकामाच्या तीन महिन्यात पुन्हा खड्डे जैसे थे झाले. उलट रस्त्यावर खड्डय़ांची गर्दी वाढू लागली. संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी त्यांच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत अनेकदा नागरिकांनी केली असताना त्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले.

मलाईदार कामे करण्यातच त्यांनी जास्त आनंद घेतला. आज रस्त्यावर यमदूत उभा ठाकल्यासारखी अवस्था आहे. रस्त्याची काठ खोल पडली तर अनेक ठिकाणी रस्ता दाबल्या गेला आहे. वाहने चालविणे सोडा साधी सायकल चालविणेसुद्धा कठीण झाले आहे. सदर रस्ता काही महिन्यांअगोदर जि.प. बांधकाम विभागाने राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. मात्र नागरिकांची ओरड वाढली होती. जि.प. सदस्यांना नागरिक तीन वर्षाचा हिशेब मागू लागली. वाहने चालवायची कशी असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे खडकी हे जि.प. सदस्यांचे गाव तर पालोरा हे त्यांचे मुख्य राजकीय गाव म्हणून ओळखले जाते. दोन्ही गावात त्यांना नागरिकांची बोलणी ऐकावी लागत आहे. (वार्ताहर)