शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जेसीबीने फोडला रस्ता

By admin | Updated: December 30, 2016 01:42 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाखो रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला. एका इसमाने

आंबागड येथील प्रकार : अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह तुमसर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाखो रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला. एका इसमाने हा रस्ता जेसीबीने फोडला. या प्रकरणाची लेखी तक्रार ग्रामस्थांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केली. परंतु अजूनपर्यंत चौकशी झाली नाही. अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मौजा आंबागड येथे सन २०१३-१४ या वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद तितीरमारे ते रणधीर पटले यांच्या शेतीपर्यंत पांदन रस्त्याचे माती व मुरुम कामे करण्यात आली होती. लाखो रुपये या रस्त्यावर खर्च करण्यात आले. रस्ता फोडल्याने सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांना शेतीवर जाता येत नाही. एका इसमाने जेसीबी मशीनने रस्ता फोडला. तिथे शेत तयार केले. रस्त्याची माती लगतच्या बोडीत टाकली. उर्वरीत माती मुरुम दुसरा रस्ता तयार करण्याकरिता वापरात आणली. गट ग्रामपंचायतच्या आंबागड येथील पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. आंबागडच्या तलाठी व्ही.डी. टांगले, कोतवाल अजय कावळे यांनी मोका चौकशी करून पंचनामा तयार केला. पंचनामा तयार करतेवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारीसह कर्मचारी उपस्थित होते. रस्त्याची जागा महसूल जिल्हा परिषद व वनविभागाअंतर्गत येत आहे. सुमारे ३० जणांनी स्वाक्षरीनिशी खंडविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाची लेखी तक्रार दिली. परंतु आजपावेतो या तक्रारीची साधी दखल घेण्यात आली नाही. शासनाचे लाखो रुपये रस्त्यावर खर्च झाले. संबंधित इसमावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. (तालुका प्रतिनिधी)