जांब (लोहारा) : सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी अंतर्गत सकरला ते जांब रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम दोन महिन्यापासून अर्धवट खोदकाम करुन रखडलेला आहे. रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामामुळे रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असल्याने काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दोन महिन्यापासून खोदून ठेवण्यात आले व तेव्हापासून हे काम पूर्णत: बंद आहे. सकरला ते जांब रस्त्यापूर्वीच उखडलेला असून मोठमोठे खड्डे पडले आहे. यात दोन ते तीन महिन्यापासून या रस्त्याचे रुंदीकरणाकरिता रस्ता खोदलेला आहे. पण काम दोन महिन्यापासून बंद असल्याने या रस्त्याने प्रवास करताना जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अर्धवट खोदकाम असल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून सकरला ते जांब या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी विरेंद्र सूर्यवंशी, किशोर मोहतुरे, बंडू गोंदुळे, मनोज आगाशे, पुरुषोत्तम गोंदुळे तसेच गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
रस्त्याचे डांबरीकरण थंडबस्त्यात
By admin | Updated: February 22, 2015 00:34 IST