शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील वैनगंगेचे नदीपात्र आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:46 IST

गतवर्षी कमी पडलेल्या पावसामुळे व उन्हाची दाहकता वाढल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण अधिकच वाढले आहे. परिणामी मार्च अखेर मध्ये जीवनदायनी वैनगंगेचे पात्र तर आटले आहे. त्याचबरोबर इटकवेल सभोवतालचे पाणी आटल्याने तुमसरकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात ही समस्या उग्ररुप धारण करेल.

ठळक मुद्देपाणी समस्या भेडसावणार : नगराध्यक्षांनी केली वैनगंगेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गतवर्षी कमी पडलेल्या पावसामुळे व उन्हाची दाहकता वाढल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण अधिकच वाढले आहे. परिणामी मार्च अखेर मध्ये जीवनदायनी वैनगंगेचे पात्र तर आटले आहे. त्याचबरोबर इटकवेल सभोवतालचे पाणी आटल्याने तुमसरकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात ही समस्या उग्ररुप धारण करेल. त्याकरिता तुमसरकरांनी पाण्याचा वापर जरा जपूनच करा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी केले आहे.तुमसर शहराला जीवनदायीनी वैनगंगा नदी पात्रातील माडगी पंप हाऊस येथून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु नदीपात्रच आटल्याने पात्रातील इंटकवेल मध्ये पाणीच पोहचु शकत नसल्याने पाणी पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी वेळीच दखल घेतली व पाणीपुरवठा सभापती पंकज बालपांडे व अभियंता सचिन कांबळे यांना सोबत घेवुन माडगी पंप हाऊसला भेट दिली. पाहणी अंती नदीपात्रात मजुराच्या साहाय्याने इंटकवेल पर्यंत पाणी वळते करुन तुर्तास तुमसर वासीयांची गरज भागविली. नदीमध्ये जोपर्यंत पाणी आहे. तोपर्यंत पाणी इंटकवेल मध्ये आणण्याची सोय न.प. द्वारे केल्या जाणार आहे. त्याकरिता आता पासूनच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करता येईल, त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.