शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट धान्याचा पुरवठा

By admin | Updated: May 22, 2014 23:39 IST

सावली तालुक्यात येणार्‍या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे.

उपरी : सावली तालुक्यात येणार्‍या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे. ग्राहकांची बोंब असूनही संबंधित विभाग मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकात शासनाच्या कार्यप्रणालीबाबत रोष व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने मागील तीन महिन्यापूर्वी नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदुळ ३ रु. प्रति किलो तर गहू २ रु. प्रति किलो प्रमाणे धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हे धान्य अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो धान्य देण्याची अंमलबजावणी केली. यात अंत्योदय, बिपीेल कार्डधारकांचा समावेश आहे. यापूर्वी एका राशन कार्डवर ३५ किलो धान्य मिळत होते. मात्र अन्न सुरक्षा योजना आल्यापासून अंत्योदय कार्ड धारकांना ३५ किलो धान्य तर बिपीएल कार्डधारकांना प्रत्येक मताला ५ किलो धान्य देण्यात येत आहे. यामुळे बर्‍याच कुटुंबाना या योजनेचा फटका बसला आहे. दोन-तीन जणांचे कुटुंब असल्यास त्या कुटुंबास फक्त १० ते १५ किलो धान्य मिळत आहे. यात महिनाभराचे राशन घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे या योजनेत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे एपीेल काळे धारकांचे तांदुळ गहू पुर्णत: बंद झाल्याने कार्ड धारकांना धान्य पुरवठा करण्यात यावा अशीही मागणी होत आहे.सदर योजना लागू झाल्यापासून मागील तीन महिन्यापासून साखर पुरवठा बंद पडला असल्याने स्वस्त धान्य दुकानातील साखर नागरिकांसाठी कडू झाली आहे. तर दुसरीकडे स्वस्त दरात धान्य पुरवठा होत असल्याने स्वस्त धान्य दुकानात येणारा गहू निकृष्ट दर्जाचा, सडका पद्धतीचा येत आहे. स्वस्त धान्य दुकानदार त्या गव्हाची विल्हेवाट कार्डधारकांकडे लावत आहे. त्यामुळे नागरिकात बोंब उडाली आहे.(वार्ताहर)