शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिवांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

राज्यात पावसाने मारलेली दडी आणि खोळबंलेल्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज शुक्रवारला ...

भंडारा : राज्यात पावसाने मारलेली दडी आणि खोळबंलेल्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज शुक्रवारला राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पीक परिस्थितीचा आढावा घेतला.राज्यात मराठवाडा विभागात अजूनही फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला त्याचबरोबर जिल्ह्याातील बियाण्यांची व खतांची उपलब्धता व मागणी याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. शेतकऱ्यांचे धान नर्सरी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र आज सकाळपासून जिल्हयात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात ९० टक्के भात नर्सरी झाली असून तुरीची ७३ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात बियाण्यांची व खताची कमतरता नाही, असे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. जिल्ह्यात किसान पोर्टलवर २९ हजार ५३६ शेतकऱ्यांनी नोंदणी झालेली आहे. या पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, पीक परिस्थती, किड व रोगांची माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)१५ दिवसानंतर पावसाची हजेरीपवनी : तालुक्यात मागील १५ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांचे पऱ्हे वाळलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. चौरास भागात ज्या भागात सिंचनाची सोय आहे, अशा भागात २० टक्के रोवणी आटोपलेली आहे. मात्र कोरडवाहू भागात पऱ्हे पाण्याच्या प्रतिक्षेत सुकत आहेत. काल रात्री पावसाने एकाएकी जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या भागात सिंचनाद्वारे रोवणी झाली आहे. ती रोवणीसुध्दा संकटात सापडली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल गेल्यामुळे रोवणीला पाणी पुरविणे कठिण झाले होते. आणखी एक आठवडा पाऊस आला नसता तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असती.पवनी तालुक्यातील या भागात मोठ्या प्रमाणात धानपिकाची शेती केली जाते. धानपिकाला पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. कोरडवाहू भागात पऱ्हे वाचविण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा दुष्काळ तर पडणार नाही ना! या चिंतेने शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र गुरुवारला रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे उद्यापासून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.