शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अंदाज समितीने घेतला बावनथडीचा आढावा

By admin | Updated: September 9, 2015 00:24 IST

सिंचन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अंदाज समितीने आज मंगळवारला तुमसर तालुक्यातील आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाची पाहणी केली.

प्रकल्पग्रस्तांशी केली चर्चा : समितीच्या नऊ आमदारांनी केली पाहणीभंडारा : सिंचन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अंदाज समितीने आज मंगळवारला तुमसर तालुक्यातील आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी या समितीने प्रकल्पाचा आढावा घेतला. ही समिती पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करणार होते परंतु यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यामुळे या समितीने बावनथडीची पाहणी केली. उद्या ९ सप्टेंबरला विदर्भातील अन्य प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नागपूर येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्य सरकारला निरीक्षण अहवारल सादर करणार आहेत. जालनाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या या समितीत नऊ आमदारांनी मंगळवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील बावनथडी सिंचन प्रकल्प स्थळाला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत तुमसरचे आमदार चरण वाघमारे, उत्तर नागपूरचे आमदार मिलिंद माने, यवतमाळचे आमदार मदन येरावार, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, धामनगावचे आमदार विरेंद्र जगताप, नेवासाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, नागपूरचे आमदार अनिल सोले उपस्थित होते. या अंदाज समितीने बावनथडी प्रकल्पाचे सुक्ष्मरित्या निरीक्षण करुन भौगोलिक स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रकल्पाच्या प्रलंबित कामाची माहिती घेतली. भुमी संपादित किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे यासह प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. समितीच्या सदस्यांनी सुमारे तीन तास प्रकल्प स्थळावर पाहणी केली. या दरम्यान त्यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता समितीचे सदस्य नागपूरकडे रवाना झाले. या समितीच्या दौऱ्यात विदर्भ सिंच विकास महामंडळाचे निदेशक शुक्ला, भंडाराचे जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते. आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्प २०१२ मध्ये पूर्ण झाला आहे. ११९ शेतकऱ्यांना भूमी संपादनासाठी ७२ कोटी रुपयांची गरज आहे. अपूर्ण कामांसाठी ११ कोटी आणि प्रस्तावित कामांसाठी ३७ कोटी असे एकूण १२० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. अंदाज समितीच्या दौऱ्यामुळे आपण समाधानी असून आता बावनथडी प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना वेग येईल. शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल. प्रलंबित कामे पुर्ण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अंदाज समितीचे सदस्य आमदार चरण वाघमारे यांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)