शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करीला महसूल, पोलिसांचा आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकाही रेती घाटांचा लिलाव झाला नाही तरी नदीपात्रातून सर्रास रेतीचे ...

ठळक मुद्देतुमसर तालुका : लिलाव नसतानाही रेतीचे उत्खनन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकाही रेती घाटांचा लिलाव झाला नाही तरी नदीपात्रातून सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे. रेतीची चोरी येथे महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू आहे. संपूर्ण यंत्रणा रेती माफियांच्या पाठीशी उभी असल्याची चर्चा आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सर्वात नद्यांच्या घाटातून सध्या रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. रेती घाटांचा लिलाव महसूल प्रशासनाने केला नाही. यामुळे बेसुमार रेतीचा उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणाला येथे धोका निर्माण झाला आहे. पाणी समस्येत वाढ झाली आहे. दररोज शेकडो ट्रॅक्टर नदी पात्रातून रेती वाहून नेतानी दिसतात. रस्त्यावर शेकडो रेतीचे ट्रक धावतांनी दिसतात. येथे रेती तस्करीला महसूल व पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सुमारे १०० किमी नदीचा प्रवास आहे. दरम्यान येथील रेती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. पांढरी शुभ्र दाणेदार रेतीला नागपूर येथे प्रचंड मागणी आहे. रेतीघाट लिलावाचा कार्यकाळ संपला आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्रास रेतीचे नदी पात्रातून उत्खनन सुरू आहे. रेती वाहतुकीदरम्यान मध्यप्रदेशातील चोरट्या टीपीचा वापर केला जातो. एक मोठे रॅकेट सक्रीय आहे. सदर रॅकेटला कुणीच उद्वस्त करू शकत नाही, अशी मुजोरी सध्या दोन्ही जिल्ह्यात रेती माफिया करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने सर्रास रेतीची तस्करी सुरू असल्याचा आरोप होत आहे.