शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

रेतीघाटांतून मिळाला १६.९२ कोटींचा महसूल

By admin | Updated: January 23, 2015 01:11 IST

जिल्ह्यातील लिलावासाठी पात्र ५२ घाटांपैकी ई-टेंडरींगद्वारे ३२ घाट लिलावात काढण्यात आले. त्याची शासकीय किंमत (किमान अपेक्षीत) १३ कोटी ६६ लाख ६ हजार ४०० रूपये होती.

देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यातील लिलावासाठी पात्र ५२ घाटांपैकी ई-टेंडरींगद्वारे ३२ घाट लिलावात काढण्यात आले. त्याची शासकीय किंमत (किमान अपेक्षीत) १३ कोटी ६६ लाख ६ हजार ४०० रूपये होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना ३ कोटी २६ लाख ५५ हजार १५८ रूपये अधिक किंमत मिळाली. त्यामुळे उशिरा लिलाव प्रक्रिया झाली असली तरी चांगली किंमत मिळाली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात भर पडणार आहे.जिल्ह्यात एकूण ५४ रेतीघाट आहेत. मागीलवर्षी २३ घाटांचा लिलाव झाला होता. लिलावात गेलेल्या घाटांची मुदत सप्टेंबर अखेरला संपली. तेव्हापासून रेतीमाफियांकडून चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा सुरू होता. यावर्षी पर्यावरण मंजूरी प्राप्त रेतीघाटांची संख्या ५२ आहे. त्यातून १३ कोटी ६६ लाख ६ हजार ४०० रूपये किमान महसूल मिळणे अपेक्षित होते. ई-टेंडरींगद्वारे ३२ घाटांचे लिलाव प्रक्रिया पार पडली. यातून १६ कोटी ९२ लाख ६१ हजार ५५८ रूपये प्राप्त झाली आहे. आता पुन्हा उर्वरित २० रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सन २०१४-१५ करीता ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या मुदतीसाठी १६ जानेवारी रोजी ई-लिलावात ३२ रेतीघाटांची प्रक्रिया पार पडली. यात भंडारा तालुक्यातील टाकळी, तुमसर तालुक्यातील चारगाव, ब्राम्हणी, तामसवाडी, देवनारा, लोभी (दिग्धा रेतीघाट), सुकळी दे., वारपिंडकेपार, आष्टी (आंजनविहिर). साकोली तालुक्यातील वडेटेकर, धर्मापुरी (पश्चिम रेतीघाट), महालगाव (अ), लवारी. लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव, पळसगाव, पाथरी, भुगाव. लाखांदूर तालुक्यातील ईटान, आंतरगाव, आसोला, नांदेड. मोहाडी तालुक्यातील बेटाळा (अ) टाकळी, बेटाळा (ब) कान्हाळगाव, मुंढरी (बु.), ढिवरवाडा. पवनी तालुक्यातील वलनी, जुनोना, येनोळा, गुडेगाव, ईटगावचा समावेश आहे.२० घाटांची लिलाव प्रक्रिया सुरूभंडारा जिल्ह्यातील जे रेतीघाट १६ जानेवारी रोजी लिलावात ई-निविदा बोली प्राप्त झाली नाही, अशा २० रेतीघाटाची ई-निविदा व ई लिलावाद्वारे रेतीची निर्गतीकरण्यासाठी लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २० रेतीघाटांमध्ये भंडारा तालुक्यातील कोथुर्णा, मांडवी, खमारी, टाकळी-निर्वाण सुरेवाडा रेतीघाट. मोहाडी तालुक्यातील पाचगाव दोन, मोहगाव देवी क्रमांक १, बोथली, पांजरा रेतीघाट, निलज बु. पवनी तालुका उमरी चौ., भोजापूर, पवनी. लाखांदूर :मोहरणा, गवराळा, धर्मापुरी, दिघोरी मोठी. तुमसर तालुक्यातील मांडवी. साकोली तालुक्यातील गिरोला, परसोडी (पोवारटोली), महालगाव (ब) या रेतीघाटांचा समावेश आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकारभंडारा जिल्ह्यात एकूण ५२ रेतीघाट आहेत. रेती चोरीवर आळा बसावा यासाठी सर्वच रेतीघाटांचा लिलाव होणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरीसाठी घ्यावी लागते. या मंजुरीसाठी अहवाल पाठविताना प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास करुन अहवाल पाठविण्यात आला. पर्यावरण विभागाने सर्वच रेतीघाटांना मंजुरी दिली असून ३२ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला आहे. ऊर्वरित रेतीघाटांचा लिलाव लवकरच करण्यात येणार असून शासनाचा महसूल अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. ज्या रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत, त्याठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाने रेतीचे ट्रक किंवा ट्रॅक्टर पकडल्यानंतर गुन्हा दाखल केला पाहिजे. महसूल विभागाला केवळ दंडाचे आधिकार आहेत. त्यामुळे दंड आकारुन वाहन सोडून देण्यात येते. आता हे वाहनच जप्त करण्यात यावे, असा प्रस्तावर ठेवणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संपत्ती असलेल्या गौण खनिजाचे जतन होईल. आणि तस्करांचे अवैध धंदे बंद होतील, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी व्यक्त केली आहे.