लक्ष्मीकांत तागडे - पवनीतालुक्यातील पात्र ८ रेतीघाटांपैकी ई-टेंडरींगद्वारे ५ घाट लिलावात काढण्यात आले. त्याची शासकीय किंमत ३ कोटी ५४ लक्ष ६७ हजार ६५३ रूपये होती. मात्र प्रत्यक्षात १ कोटी ८७ लक्ष १ हजार ३५६ रूपये म्हणजेच ५३ टक्के अधिक किंमत मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील महसूलात पवनी तालुक्याचा मोठा वाटा असणार आहे.पवनी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. त्यामुळे येथे अनेक रेतीघाटाची निर्मिती झाली आहे. येथील रेतीमध्ये ०.५० ते २ टक्के फक्त मातीचे प्रमाण असल्यामुळे येथील रेती उच्च दर्जाची समजली जाते. लिलावात गेलेल्या घाटांची मुदत सप्टेंबर अखेर संपली होती. तेव्हापासून रेतीमाफीया कडून चोरट्या मार्गाने उपसा सुरू होता. रोज लाखो रूपयाचा व्यवहार सुरू होता.तालुक्यात यावर्षी पर्यावरण मंजुरी प्राप्त रेतीघाटांची संख्या ८ आहे. त्यातून ६ कोटी १२ लक्ष ५८ हजार ८८३ रूपये किमान मिळने अपेक्षीत होते. ई-टेंडरींगद्वारे ५ घाटांची लिलाव प्रक्रिया पार पडली. यातून ५ कोटी ४१ लक्ष, ६९ हजार ९ रूपये प्राप्त झत्तले आहेत.यामध्ये सर्वात अधीक १०२ टक्के महसूल येनोळा घाटाने तर सर्वात कमी १ टक्का महसूल गुडेगाव घाटाने दिला आहे. वलनी घाटाची, जुनोना, येनोळाची प्रत्येकी ५४ लक्ष ५६ हजार ५६२ रूपये, गुडेगाव घाटाची १ कोटी ९ लक्ष १३ हजार १२४ रूपये होती. पण प्रत्यक्षात वलनी ९५ लक्ष ३५ हजार रूपये, जुनोना १ कोटी १० लक्ष २३ हजार १२५ रूपये व ईटगाव घाटाला १ कोटी ५८ लक्ष ८८ हजार ८८४ रूपये किंमत मिळाली आहे. या घाटांना अनुक्रमे ४० लक्ष, ७८ हजार, ४३८ रूपये, ७५ टक्के, १२ लक्ष ६५ हजार ४३८ रूपये २३ टक्के, ५५ लक्ष ४३ हजार ४३८ रूपये १०२ टक्के, १ लक्ष १० हजार १ रूपये १ टक्के व ७७ लक्ष ४ हजार ४१ रूपये ९४ टक्के अधिकची किंमत आहे. शिल्लक असलेल्या उमरी चौ. भोजापूर व पवनी या रेतीघाटाची ई-लिलावाची प्रक्रिया सुरू आहे.
रेतीघाट लिलावातून ५.४१ कोटींचा महसूल
By admin | Updated: February 9, 2015 23:07 IST