शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खंडविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर?

By admin | Updated: May 26, 2016 01:36 IST

येरली येथील रस्ता कामाची तज्ञाकडून चौकशी न करणे तथा मागील पाच महिन्यांपासून पंचायत समिती सभापतीसह इतर सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे ....

अधिकारी म्हणतात, वैद्यकीय रजेवर : सदस्य म्हणतात सक्तीच्या रजेवरतुमसर : येरली येथील रस्ता कामाची तज्ञाकडून चौकशी न करणे तथा मागील पाच महिन्यांपासून पंचायत समिती सभापतीसह इतर सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे या व अन्य बाबींची वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर खंडविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.तुमसर पंचायत समिती कार्यालय मागील एका वर्षापूर्वी खंडविकास अधिकारी म्हणून केशव गड्डापोड रुजू झाले. त्यांची पहिलीच पोस्टींग आहे. सुरुवातीला काही महिने उत्तम कार्याची चूणूक त्यांनी दाखविली होती. तरुण खंडविकास अधिकारी व कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. परंतु पाच महिन्यांपासून पंचायत समिती सभापती व इतर सदस्यांना विविध विकास कामात विश्वासात ते घेत नाही म्हणून असंतोष होता.२० दिवसापूर्वी येरली येथील सिमेंट रस्ता प्रकरणाची चौकशी संदर्भात दोन पत्रकार परिषदा झाल्या. यात चौकशी ही तज्ज्ञाकडून न करता विस्तार अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. चौकशी अहवालामागील सहा महिन्यापासून प्रलंबित आहे. दक्षता समितीला ते अनुपस्थितीत होते याकडे आमदार चरण वाघमारे यांनी लक्ष वेधले होते. १२ दिवसापूर्वी ते रजेवर गेले यासंदर्भात आ. वाघमारे यांनी उपखंडविकास अधिकाऱ्यांना प्रभार दिला का अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी प्रभार दिला नाही असे उत्तर दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मनोज हिरूडकर यांच्याकडे प्रभाराचे पत्र दिले. (तालुका प्रतिनिधी)कार्यकाळ पूर्णतुमसरचे खंडविकास अधिकाऱ्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. परिविक्षाधीन खंडविकास म्हणून त्यांची नियुक्ती केल्याची माहिती आहे. उन्हाळा सुरु झाल्याने नविन खंडविकास अधिकारी स्थानांतरण झाल्यावर कार्यक्षेत्राची माहिती घेण्यास वेळ लागेल म्हणून शासनाने खंडविकास अधिकाऱ्यांचे स्थानांतरण प्रक्रीया थांबविली होती असे समजते. नविन खंडविकास अधिकाऱ्यांचे पुन्हा मुंबई व दिल्ली येथील प्रशिक्षण होणे शिल्लक आहे. अशातच त्यांना सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले परंतु याबातीत अधिकारी स्पष्ट उत्तर देत नाहीत हे विशेष.