शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परतीच्या पावसाचा १३ हजार शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 07:00 IST

Bhandara News, Agriculture भंडारा जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात५७५ गावातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीची आस आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ७८ हजार ७६८ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे होते. जिल्ह्यात ७ ते ११ आॅक्टोंबर या कालावधीत परतीचा पाऊस कोसळला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेला धान ओला झाला. कापूण ठेवलेल्या कळपा भिजून पिकाचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी कळप्यांना आता कोंब फूटत आहे. जिल्ह्यातील ५७५ गावांना या पावसाचा जबर फटका बसला. नऊ हजार ५४२ हेक्टरवरील पीक बाधित झाले. भंडारा तालुक्यातील ३५ गावातील ५८७ शेतकऱ्यांचे १९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

मोहाडी तालुक्यातील ७७ गावातील २०२८ शेतकऱ्यांचे १०६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तुमसर तालुक्यातील ८१ गावातील ५६४ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून ३४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. पवनी तालुक्यातील १४९ गावातील सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला. तालुक्यात ५५५४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. साकोली तालुक्यातील ९६ गावातील २०५ शेतकऱ्यांचे २५८ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. साकोली तालुक्यातील ९८ गावातील २०१३ शेतकऱ्यांचे १५५० हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले. लाखांदूर तालुक्यातील ३९ गावातील ८२० शेतकऱ्यांचे ५७५ हेक्टरवरील पीक पावसाने बाधित झाले.महापुरानेही अनेक गावातील पीक उद्ध्वस्त झाले होते. त्यातून सावरत नाही तोच आता परतीच्या पावसाने तडाखा दिला. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार जिल्ह्यात धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. ३३ टक्क्यावर सहा हजार हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसाने नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ३३ टक्क्याच्यावर सहा हजार ५५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले असून ३३ टक्केच्यावर ४३०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कृषी विभागाच्यावतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी अपेक्षा होत आहे.

 

 

टॅग्स :agricultureशेती