शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन थिएटरमधून पाठवितात रुग्णांना परत

By admin | Updated: February 3, 2015 22:49 IST

सर्वसामान्यांचा दवाखाना अशी ओळख असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अस्थिरूग्णांची महिनाभरापासून हेळसांड होत आहे. रूग्णालय प्रशासनाकडून अस्थिरूग्णांची थट्टा सुरु आहे.

भंडारा : सर्वसामान्यांचा दवाखाना अशी ओळख असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अस्थिरूग्णांची महिनाभरापासून हेळसांड होत आहे. रूग्णालय प्रशासनाकडून अस्थिरूग्णांची थट्टा सुरु आहे. शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रूग्णांना आॅपरेशन थिएटरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना भूलतज्ज्ञ व साहित्य नसल्याचे सांगून परत वॉर्डात पाठविण्याचा जिवघेणा प्रकार सुरू आहे. हा प्रकार माहित होताच सदर प्रतिनिधीने रुग्णालयात भेट दिली असता रूग्णांनी कैफियत मांडली.भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील रूग्ण उपचारासाठी येतात. सामान्य रूग्णालय परवडण्याजोगे असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक शासकीय रूग्णालयात धाव घेतात. येथे तिसऱ्या माळ्यावर वॉर्ड क्रमांक १५ मध्ये अस्थिरूग्ण विभाग आहे. या विभागात सामान्य रूग्णालय प्रशासनाने रूग्णांसाठी १२ खाटांची व्यवस्था केली आहे. येथे उपचारासाठी दाखल काही रूग्ण महिनाभरापासून शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यावर अद्याप शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही.मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील श्रीराम उरकुडा खाटेकर यांच्या डाव्या पायाचे हाड मोडल्यानंतर ते ३ जानेवारीला रूग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांना लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, आता महिना लोटला तरीही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून मोडलेल्या हाडाला आधार रहावा, म्हणून पायात रॉड टाकावयाचा आहे. मात्र, सामान्य रूग्णालयात रॉड व बेशुध्दीचे इंजेक्शन देणारे तज्ज्ञ नसल्यामुळे त्यांना महिनाभरापासून दवाखान्यात पडून रहावे लागले आहे. त्यांच्या सेवेसाठी त्यांच्याजवळ मुलगा आहे. भंडारा येथे नातेवाईक राहत नसल्यामुळे भोजनाची गंभीर परिस्थिती त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे खासगी रूग्णालयात उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा रोजीरोटी सोडून वडिलांसोबत रूग्णालयात आहे. येथील अस्थिविभागाचे डॉक्टर त्यांना एक दिवसाआड शस्त्रक्रिया होईल, असे सांगत आहेत. मात्र, साहित्य व भूलतज्ज्ञाअभावी शस्त्रक्रिया लांबणीवर पडत आहे.भंडारा तालुक्यातील आंबाडी येथील बलदेव दयाराम बावनकर हे वेटरचे काम करून आपल्या कुटूंबाचा गाडा हाकतात. त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पायात असलेला रॉड आता काढायचा आहे. यामुळे ते ५ जानेवारीला सामान्य रूग्णालयात दाखल झाले. याला महिना लोटत आहे. त्यांचीही तीच परिस्थिती आहे. येथील अस्थिरोग तज्ज्ञ त्यांना शस्त्रक्रियेची हमी देत असले तरी ते केव्हा होईल हे सांगत नाहीत. यावेळी बलदेव म्हणाला, सोमवारला शस्त्रक्रिया करायचे असल्याचे डॉक्टरांनी सांगून आॅपरेशन थिएटरमध्ये नेले. शस्त्रक्रियापूर्वीचे कपडे घालायला सांगून आॅपरेशन टेबलवर झोपविले. तत्पूर्वी त्यांना सलाईन लावली. त्यानंतर बेशुध्दीचे इंजेक्शन देणारा व रॉड काढायचे साहित्य नसल्याचे सांगून आॅपरेशन न करताच तिसऱ्या माळ्यावरील वॉर्डात परत पाठविले. त्यांच्या पायातील रॉड १८ महिन्यात काढायला हवा होता, मात्र २४ महिन्यानंतरही रॉड काढण्यात आलेला नाही. महिनाभरापासून दवाखान्यात असल्यामुळे कुटूंबही आर्थिक संकटात सापडल्याचे सांगून बलदेव यांनी अश्रुंना वाट करुन दिली. (शहर प्रतिनिधी)