शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

ग्राहकाचे ३७ हजार परत करा

By admin | Updated: November 29, 2014 00:46 IST

कर्जावर खरेदी केलेल्या दुचाकीची रक्कम पुर्णत: भरुनही मूळ नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या लक्ष्मी मोटर्स लाखनी ....

भंडारा : कर्जावर खरेदी केलेल्या दुचाकीची रक्कम पुर्णत: भरुनही मूळ नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या लक्ष्मी मोटर्स लाखनी आणि वृषभ फायनान्स गोंदिया यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकाचे ३७ हजार परत करण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी दिले. हिचिंद्र हिवाजी बावणे रा. मोगरा ता. लाखनी यांनी लक्ष्मी मोटर्स लाखनी येथून दि.२८ मे रोजी ४४,७६३ रूपयांमध्ये दुचाकी वाहन खरेदी केले. त्याकरीता त्यांनी २१,२५० रूपये जमा केले. ऊर्वरित २३,५१३ रूपयाचे कर्ज वृषभ फायनान्स गोंदिया या वित्तीय कंपनीकडून घेतले. सदर कर्ज २४ समान मासिक हप्त्यामध्ये १,६८० रूपयाप्रमाणे जून २०११ पासून भरावयाचे होते. हिचिंद्र बावणे यांनी सदर वाहन लक्ष्मी मोटर्स लाखनीकडून खरेदी केले असून वृषभ फायनान्सच्या नियमानुसार सुरूवातीचे समान मासिक कर्ज परतफेडीचे नऊ हप्ते वृषभ फायनान्समध्ये भरण्यासाठी लक्ष्मी मोटर्सकडे जमा केले. ऊर्वरित १४ हप्ते लक्ष्मी मोटर्सच्या भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या लाखनी शाखेत जमा केले. त्यानंतर २९ मे २०१२ रोजी फायनान्स कंपनीचे कर्मचारी बावणे यांच्याकडे आले. त्यांनी दोन हप्त्याची रक्कम भरली नाही, असे सांगून दीड हजार रूपये दंडाची रक्कम वसूल केली. त्यानंतर बावणे यांनी गोंदिया येथे वृषभ फायनान्सच्या व्यवस्थापकाशी भेट घेतली. त्यांना वाहनाचे मुळ नोंदणी प्रमाणपत्र परत मागितले. मात्र व्यवस्थापकाने तुमच्याकडे १०,८४० रूपये शिल्लक आहे. ही रक्कम भरल्याशिवाय नोंदणी प्रमाणपत्र मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर १७ आॅक्टोंबर २०१३ रोजी फायनान्स कंपनीचे कर्मचाऱ्यांनी बावणे यांना रकमेची मागणी केली. याप्रकरणी बावने यांनी पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता न्यायालयात दाद मागण्याची समज दिली. त्यानंतर बावणे यांनी भंडारा येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. न्यायालयाने साक्ष पुराव्याच्या तपासाअंती ग्राहक मंचने वृषभ फायनान्स कंपनीने वाहनाची मूळ नोंदणी प्रमाणपत्र परत करावे, मोटर वाहन कायद्याप्रमाणे वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील फायनान्सरचे नाव कमी करावे, मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे लक्ष्मी मोटर्स यांनी १० हजार रूपये व वृषभ फायनान्स यांनी १५ हजार रूपये तसेच नोटीसचा खर्च म्हणून दोन हजार रूपये द्यावे, असे आदेश दिले. लक्ष्मी मोटर्स व वृषभ फायनान्सने बावणे यांना तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी पाच हजार रूपये असे १० हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहे. (प्रतिनिधी)