शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुडतुड्याची मदत मुख्यमंत्र्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:35 IST

तुटपुंजी रक्कम : किरमटीच्या शेतकऱ्याने केली मनीआॅर्डर, गतवर्षी झाले होते शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : शासनाकडून ...

तुटपुंजी रक्कम : किरमटीच्या शेतकऱ्याने केली मनीआॅर्डर, गतवर्षी झाले होते शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाकडून धान पिकावर आलेल्या तुडतुड्याची तुटपूंजी मदत प्राप्त झाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर करुन मदत परत पाठविली. लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील शेतकऱ्यांने ही मनीआॅर्डर केली असून तहसीलदारांना निवेदन दिले आहे.लाखांदूर तालुक्यात गतवर्षी धानपिकावर मोठ्या प्रमाणात तुडतुड्याचे आक्रमण झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान शासनाकडून नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर झाली. हेक्टरी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अलीकडे मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. ही रक्कम अत्यंत तुटपूंजी असल्याने शेतकरी संतप्त होत आहे. यातूनच किरमटी येथील अल्पभूधारक शेतकरी जयपाल प्रकाश भांडारकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या नावाने स्थानिक पोष्टातून मनीआॅर्डर करुन मदत नाकारली.जयपाल भांडारकर यांच्याकडे २ हेक्टर १६ आर जमीन आहे. गतवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली. अशा परिस्थितीत जयपालने आटापीटा करुन रोवणी केली. दरम्यान धानावर खोडकिडा, मावा, तुडतुडा आदी किडींनी आक्रमण केले. त्यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.जयपाल भांडारकर यांना सुध्दा लाभ मिळाला. विरली बुज साझाचे तलाठ्याने तुडतुड्याची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. त्यावरुन जयपाल याने लाखांदूरच्या बँक आॅफ इंडियात चौकशी केली. तेव्हा त्यांच्या खात्यात १.१६ आर जमीनीचे फक्त ३ हजार ३७५ रुपये जमा झाल्याचे दिसून आले.शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार बँक खात्यात सुमारो सात हजार रुपये जमा होणे अपेक्षित होते. मात्र तुटपूंजी रक्कम जमा झाल्याने जयपाल संतप्त झाला. त्याने थेट लाखांदूर येथील पोस्ट आॅफीस गाठून ३ हजार ३७५ रुपयांची मनिआॅर्डर मुख्यमंत्र्यांच्या नावाने केली. तसेच लाखांदूरचे तहसीलदार संतोष महल्ले यांनाही निवेदन दिले.मिळाले तेवढ्यात समाधानी राहाआपल्या खात्यात रक्कम कमी आल्याचे दिसताच जयपाल भांडारकर यांनी तलाठी कार्यालय गाठले. तेथील तलाठ्याला याबाबत जाब विचारला तेव्हा तलाठ्याने ‘जेवढे पैसे मिळाले, तेवढ्यातच समाधानी रहा,’ असे उत्तर दिले. या उत्तराने जयपाल संतप्त झाला. जयपालसारखीच स्थिती लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे.लाखांदूर तालुक्यातील शेतकरी संतप्तशासनाने धानावरील तुडतुड्याची मदत जाहीर केली. मात्र ही मदत अतिशय तोकडी असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सर्वेक्षणातील चुकांमुळे अनेकांना अपूरी मदत मिळत आहे. अनेक शेतकरी बँक खात्यात जमा झालेली रक्कम पाहून संताप व्यक्त करीत आहेत. या शेतकºयांना घोषित केल्यानुसार मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गतवर्षीची मदत आधीच वर्षभर उशिरा आली आणि त्यातही तुटपूंजी असल्याने अनेक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत आहे.