शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांची फरफट सुरूच

By admin | Updated: July 12, 2017 00:27 IST

३० जून २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही.

गोसेखुर्द पुनर्वसन विभागाचे प्रकरण : आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३० जून २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. असे राज्य शासनाने ३० जुलै २०१३ च्या अध्यादेशात नमूद केले आहे. मात्र, शासनाच्या अध्यादेशाला न जुमानता गोसेखुर्द पूनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची अट ठेवून आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.भास्कर फाये (वरिष्ठ लिपीक), उदाराम मानकर (वरिष्ठ लिपीक), वसंत रणदिवे (वरिष्ठ लिपीक), विनासक माटूरकर (वरिष्ठ लिपीक) व प्रभाकर भोरजार (नाईक) असे अन्यायग्रस्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे पाचही कर्मचारी गोसेखुर्द पुनर्वसन विभाग आंबाडी येथून सेवानिवृत्त झालेले आहेत. शासनाच्या २४ वर्षाच्या सेवेनंतर त्यांना आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. याबाबत त्यांनी आतापर्यंत अनेकदा संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासनाने दखल घेतलेली नाही.सदर पाचही कर्मचारी अंबाडी येथील कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभागात कार्यरत होते. हे सर्व २००८ मध्ये सेवानिवृत्त झालेत. २४ वर्षाच्या सेवानिवृत्ती नियमानुसार त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो. मात्र, त्या लाभाकरिता गोसेखुर्द विभागाने या पाचही कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची अट घातली आहे. वास्तविकतेत, राज्य शासनाने ३० जुलै २०१३ मध्ये नविन अध्यादेश काढून ३० जून २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही गोसेखुर्द विभागाकडून सेवानिवृत्तांची अडवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आश्वासित प्रगती योजनेच्या दुसऱ्या लाभामुळे सेवानिवृत्तीधारकांच्या निवृत्ती वेतनात वाढ होईल. जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाहीसदर कर्मचारी २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही. तसे पत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी दिलेले आहे. याउपरांतही गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे सहायक अधिक्षक अभियंता मृ.प. कोमलकर यांनी पहिल्या अध्यादेशावर बोट ठेवून शासनाच्या २०११ च्या मुद्दा क्रमांक १३ अन्वये दिलेल्या स्पष्टीकरणाचे अवलोकन करून प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेश बजावले आहे. जूना अध्यादेशानंतर नविन अध्यादेश निर्गमित झाल्याने नविन अध्यादेशानुसार जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही, असे स्पष्ट होत असताना कर्मचाऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे.