शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 00:35 IST

मागील महिनाभरापासून कडाक्याचे उन्ह तापत होते. त्यातच बुधवारच्या रात्रीपासून गुरुवारला दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली.

रुग्णालये फुल्ल : लहान मुले सर्दी-पडशांनी त्रस्तभंडारा : मागील महिनाभरापासून कडाक्याचे उन्ह तापत होते. त्यातच बुधवारच्या रात्रीपासून गुरुवारला दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारला पुन्हा कडक उन्ह तापल्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला. परिणामी विषाणुजन्य आजार बळावले. लहान मुलांना सर्दी, पडशांनी ग्रासले असून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही गर्दी दिसून आली.मागील १५ दिवसांपासून लहान मुले तापासह सर्दी व खोकल्यांनी ग्रस्त आहेत. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. जिल्हा मुख्यालयी असलेल्या भंडाऱ्यात सामान्य रुग्णालयात बालकांसाठी विशेष कक्ष आहे. याशिवाय शहरात सात ते आठ बालरोग तज्ज्ञांची खासगी रुग्णालये आहेत. शासकीय व खासगी या सर्वच रुग्णालयांमध्ये लहान मुलांना उपचारासाठी घेऊन आलेल्या पालकांची गर्दी दिसून आली. या रुग्णालयातील सर्वच खाटा बालरुग्णांनी फुल्ल दिसून आले.उकाडा वाढलामागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यावेळी कडाक्याचे उन्ह तापत होते. हे तापमान ३८ अंशावर पोहोचले. त्यानंतर गुरुवारला सर्वत्र जोरदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची झळ होती. त्यानंतर शुक्रवारला पाऊस गायब झाला आणि ऊन्ह तापले. आजचे तापमानही ३४ अंश नोंदविण्यात आले. बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे विषाणुजन्य आजाराने ग्रासले आहे. गुरुवार व शुक्रवारला रुग्णालयात आलेल्या बालकांना ताप, सर्दी व पडसे अशी लक्षणे दिसून आली.मोठ्यांनाही सर्दी-पडसेलहान मुलांसह महिलाही सर्दीने त्रस्त दिसून आल्या. मुलांना रुग्णालयात आणलेल्या बहुतांश महिलाही तापाने होत्या. स्तनदा मातांना ताप असेल तर तिच्या बाळालाही ताप येतो. त्यामुळेही मुलांच्या आजारांचे प्रमाण वाढलेले दिसून आले. (जिल्हा प्रतिनिधी)बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे बदलत्या हवामानाचा लहान मुलांवर लवकर परिणाम होतो. मागील काही दिवसांपासून तापणारे ऊन्ह आणि गुरुवारला आलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला. हा विषाणुजन्य आजार असून पालकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करावा.- डॉ.यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.