शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तिपत्रकांसह मुद्रणावर आले निर्बंध;

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:45 IST

Bhandara : जिल्हा निवडणूक विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके आदी मुद्रणांचे संनियंत्रणासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयांना काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहे. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित प्रकाशित करता येणार नाही. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक स्वतःच त्याचा प्रकाशक आहे, याबद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये. 

निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावयाची आहे. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचे लायसन्स रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालकांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी कळविले आहे.

तर निर्बंध मोडणाऱ्यांवर होणार कारवाई निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुद्रितपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज, निवडणुकीशी संबंधित असा घोषणा फलक किंवा भित्तीफलक असा आहे. जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे व्यतिक्रमण करील, ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपये इतक्या द्रव्यदंडास किवा दोन्ही शिक्षास पात्र असेल.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024bhandara-acभंडारा