लोकांना लसीकरण करण्यासाठी हिम्मत देण्यात आली. त्यामुळे शहरातील १८६ नागरिकांनी लसीकरण केले. हा आकडा शहरातील विक्रमी आकडा आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
डोन्ट वरी ग्रुपमार्फत करण्यात आलेले जनजागृती व प्रशासनातर्फे दाखविण्यात आलेली इच्छाशक्ती महत्त्वाची ठरली. आलेल्या प्रत्येक नागरिकांचे मोबाइलवर नोंदणी करून, देण्याचे काम त्यांना योग्य माहिती देण्याचे काम व कोरोना निर्बंध असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे काम डोन्ट वरी ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले.
येणाऱ्या काळात पवनी शहरात १०० टक्के लसीकरण उद्दिष्ट ठेवले असून, डोन्ट वरी ग्रुप सतत प्रयत्नशील राहून जनजागृती करून पुढाकार घेईल, असे डोन्ट वरी ग्रुपचे वैभव बावनकर यांनी सांगितले. जनजागृतीकरिता संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, निशांत नंदनवार, शुभम बोरकर, पारितोष वंजारी, निशांत शिवरकर, धनराज सेलोकर, मयूर कुकडे यांनी पुढाकार घेतला.
270721\1719-img-20210727-wa0006.jpg
लसीकरणासाठी पुढाकार घेतलेल्या युवकांसाठी वैद्यकीय चमू.