मानेगाव (बाजार) : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत तालुका स्तरावर अपंग समावेशित संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांंंच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नि:शुल्क ग्रीष्मकालीन शिबिर आयोजित केले आहे. दररोज सकाळी ८ ते ११ पर्यंंंत आयोजित ग्रीष्मकालीन शिबिरात विशेष विद्यार्थ्यांंंसाठी विविध उपक्रम राबवून प्रशिक्षण दिले जाते. शारीरिक शिक्षण, मेडिटेशन, योगा, फिजीओथेरपी, स्पीच थेरेपी, गायन, तबला-हार्माेनियम वादन, नृत्य, विविध कला हस्तकला, वैयक्तिक शिक्षण समस्या निवारण, अपंगत्वाविषयी पालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संगीत चिकित्सा तसेच विद्यार्थ्यांंंच्या आंतरीक कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबविले जातात. या दैनंदिन ग्रीष्मकालीन शिबिरात मतिमंद, दृष्टीदोष, अस्थिव्यंग, कर्णबधीर, सेरेब्रल पाल्सी, वाचादोष, बहुविकलांग अशा सर्व प्रकारच्या विशेष गरजाधारक विद्यार्थी आनंदाचे चार क्षण अनुभवत आहेत. या विशेष विद्यार्थ्यांंंसाठी आनंद फुलविण्यात जिल्हा प्राथमिक प्रभारी शिक्षयाधिकारी घोडेस्वार, अपंग समावेशित शिक्षणाचे जिल्हा समन्वयक विलास गोंदोळे, जयश्री सावरकर, बन्सोड, गटशिक्षणाधिकारी पारधी, गटसमन्वयक चरपे, मानसोपचार तज्ज्ञ विरेंद्र बान्ते व फिजीओथेरेपिस्ट मंजूषा गजभिये यांचा सिंहाचा वाटा आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी विषयतज्ञ वडे, गोडबाटे, विशेष शिक्षक नरेंद्र सांदेवार, संगीता देशमुख, वीणा मालेवार, उज्वला खोब्रागडे, ज्योत्सना बोंबार्डे, संघमित्रा रामटेके, सुजाता वाघमारे, शिल्पा वलके, सचिन ठाकरे, सुधीर भोपे, अंकिता कानतोडे अथक परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)
ग्रीष्मकालीन शिबिराला प्रतिसाद
By admin | Updated: May 24, 2014 23:24 IST