शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

लोकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प करु या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 00:32 IST

केवळ महसुलच नाही तर सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आजच्या दिनी संकल्प करु,

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : महिला सक्षमीकरण महसूल सप्ताहाचे उद्घाटन भंडारा : केवळ महसुलच नाही तर सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आजच्या दिनी संकल्प करु, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. विविध कामासाठी शासकीय कार्यालयात येणऱ्या महिला तसेच कार्यरत महिला अधिकारी-कर्मचारी यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक मिळाली पाहिजे, सोबतच त्यांचे काम सुलभरित्या व्हावे, असेही त्यांनी सांगितले. ते महसूल विभागाच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण महसुल सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या कार्याक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी प्रदिप डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, सुजाता गंधे, विजय उरकुडे, सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम, तहसिलदार संजय पवार उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, लोकाभिमुख सेवा देण्यासाठीच आपली नेमणूक झाली असून लोकांची कामे जलदगतीने व्हावी. शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांसाठी सर्व विभाग प्रमुखांनी महिला सहायता कक्षाची स्थापना करावी अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. या सप्ताहात होणाऱ्या मेळाव्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन शासनाच्या योजना समजून घ्याव्यात व त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर महिला सक्षमीकरणात महसुल विभागाचे योगदान या विषयावर बोलतांना म्हणाल्या, प्राचीन काळापासून जमीन हे सत्तेचे केंद्र राहिले आहे. परंतु महिलांची नोंद त्यांत फार कमी आहे. महिलांना पुरुषांच्या तुलनेत हिस्सेदारी कमी आहे. सर्व योजनांची अंमलबजावणी महसूल विभागाकडे दिली आहे. तलाठी व सचिवापर्यंत महिलांनी वेळोवेळी चांगले काम केले आहे. महिलांसाठी कार्यालयात चांगली वातावरण निर्मिती केली पाहिजे. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. महसूल विभागातर्फे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन सुध्दा करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. तसेच महिलांनी जागरुकपणे मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करुन नोंदणी, वगळणी व दुरुस्ती कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. प्रस्ताविकात सुजाता गंधे म्हणाल्या, महसुल दिनानिमित्त १ आॅगस्ट ८ आॅगस्ट पर्यंत महिला सक्षमीकरण सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहात जिल्ह्यात उपविभागीय व ग्रामस्तरावर १४६ मेळावे घेण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महिलांचे प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. या मेळाव्यात महिलांनी मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या सप्ताहाचा ब्रीद वाक्य 'ताई मावशी अक्का आता जग जिंका' असे आहे. यावेळी असर फाऊंडेशनच्या वतीने उठा सकळ जन लवकरी नवी पहाट झाली या विषयावर पथनाट्य सादर केले. यात व्यसनमुक्ती, सातबारा, स्त्रियांना प्राधान्य, मत्स्यव्यवसाय, भ्रुणहत्या, आधारवड योजना, नवमतदारांसाठी विशेष मतदार मोहिम व इतर योजनांच्या जनजागृतीवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना धनादेश वाटप, मतदान छायाचित्र ओळखपत्र, सातबारा वाटप, नैसर्गिक आपत्तीत विज पडून जखमी झालेल्यांना धनादेश वाटप, राजस्व अभियानांतर्गत प्रमाणपत्र वाटप, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलीयर वाटप, विद्यार्थींनीना सायकलचे वाटप तसेच महाराजस्व अभियानांतर्गत वर्ग २ च्या जमिनीचे वर्ग १ मध्ये रुपांतरणाबाबत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महसूल दिनानिमित्त महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अव्वल कारकून, कनिष्ठ लिपीक, लघू लेखक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, वाहनचालक यांचा मान्वरांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांनी केले. महसुल सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले. त्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केला. (नगर प्रतिनिधी)