शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ओबीसी बांधवांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: December 12, 2015 00:39 IST

ओबीसींच्या जीवनाशी निगडीत मागण्यांवर सहानुभूतीने तथा गंभीरतेने विचार करून न्याय देण्यात यावे, ...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : ओबीसी सेवा संघाची मागणीभंडारा : ओबीसींच्या जीवनाशी निगडीत मागण्यांवर सहानुभूतीने तथा गंभीरतेने विचार करून न्याय देण्यात यावे, अशी मागणी ओबीसी सेवा संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षात ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीबाबत राज्य कर्त्याकडून गंभीरतेने विचार केला नाही. त्यामुळे आज ओबीसी समाजाची दयनिय अवस्था असून हलाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य घटनेतील ३४० कलमानुसार घटनात्मक संरक्षण असूनही लोकसंख्येच्या तुलनेत केंद्र आणि राज्यांच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जात नाही. नोकऱ्यामध्ये ओबीसीचा अनुशेष पूर्ण केला जात नाही. संघ लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नौकर भरतीत सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली मंडळ आयोगाची शिफारस नाकारली जात आहे. व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या फ्रि सीप साठीची उत्पन्न मर्यादा ४.५० लाखावरून ६ लाख करण्याची सभागृहात वारंवार घोषणा केली जाते. परंतु शासन निर्णय घेत नाही. व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जाला कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मिळणे, ओबीसींना लावलेले नॉनक्रिमीलेअरची अट रद्द करणे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे, ओबीसी विद्यार्थ्यांना जिल्हा स्थरावर वस्तीगृहाची व्यवस्था करणे, ओबीसी विद्यार्थ्यांकरीता एमपीएससी, युपीएससी मार्गदर्शन केंद्र चालविणे, ओबीसीसाठी एससी, एसटी प्रमाणे सर्व क्षेत्रात आरक्षणाची तरतूद करणे, खासदार नचिअप्पन संसदीय समितीच्या शिफारशी लागू करणे, शेतकऱ्यांसाठी डॉ. स्वामीनाथक समितीची शिफारस लागू करणे, एससी, एसटी, एनटी शेतकऱ्यांप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना केंद्र तसेच राज्य सरकारद्वारा देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, सवलती लागू करणे, ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणे आदी मागण्यांची पूर्तता करण्याची गरज आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर २६ जानेवारी २०१६ प्रजासत्ताक दिनापासून ओबीसी सेवा संघ, ओबीसी महिला संघ, ओबीसी विद्यार्थी संघ यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य भर जनआंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सेवा संघाने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)