शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाची समस्या सोडवू

By admin | Updated: February 7, 2015 00:18 IST

तत्कालीन आघाडी सरकारने नियोजन न केल्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागते. राज्यशासन आता पुढील १५ वर्षाचे नियोजन...

तुमसर : तत्कालीन आघाडी सरकारने नियोजन न केल्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागते. राज्यशासन आता पुढील १५ वर्षाचे नियोजन करुन त्या प्रमाणात वीज प्रकल्पांच्या उभारणीवर भर देत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विजेची समस्या लवकरच सोडविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिली.तुमसर पंचायत समितीमधील तालुका विक्री केंद्राचे भूमिपूजन, विवेकानंद सभागृह आणि उद्यानाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, सभापती संदिप टाले, उपसभापती वासुदेव वाडीभस्मे, जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, पंचायत समिती सभापती कलाम शेख, उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जेजूरकर, माजी खासदार शिशुपाल पटले उपस्थित होते.यावेळी ना. बावनकुळे म्हणाले, सरकारी योजना आणि अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याचे आर्थिक सर्व्हेक्षण केले पाहिजे. त्या आधारावर रॉकेल, गॅसचे अनुदान आणि रेशनकार्ड देण्यात यावे. जिल्हयाचा जो विकास आराखडा खासदार व आमदारांनी तयार केलेला आहे. त्यासाठी निधी आणणे ही माझी जबाबदारी आहे. यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारांचा प्रभाव संपूर्ण तालुकाभर पोहचवावा. सुंदर पंचायत समिती तयार करण्याचे काम सभापती कलाम यांनी केले. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी अशीच साथ द्यावी, भंडारा आणि गोंदिया जिल्हयाला भारनियमनमुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार चरण वाघमारे, पंचायत समिती सभापती कलाम शेख यांची समयोचित भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)