शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी केले २७ समस्यांचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:27 IST

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या विविध २७ समस्या निकाली काढून नागरिकांना न्याय दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : दवडीपार येथील ९८ घरांचे होणार पुनर्वसन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या विविध २७ समस्या निकाली काढून नागरिकांना न्याय दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मंजूषा ठवकर, अधीक्षक उत्पादन शुल्क ज्ञानेश्वरी आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येणाऱ्या दवडीपार (बेला) येथील आंशिक पुनर्वसन संदर्भात नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी अशा स्वरुपाच्या २२ गावांची बैठक घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. नागपूर अधिवेशनात या संदर्भात जलसंधारण मंत्री यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दवडीपार येथील ९८ घरांचे पुनर्वसन करण्याबाबत व गोसेबाधित स्मशानभूमी करीता जागा मिळणेबाबत नागरिकांनी निवेदन सादर केले होते. स्मशानभूमी १५ आॅगस्टपूर्वी बांधून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मौजे चिचाळ येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत सादर निवेदनावर निर्णय देतांना पालकमंत्री यांनी ३० जूनला सदर इमारतीचे उद्घाटन करण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच पाणी टंचाईबाबत योग्य निर्णय घेण्याचे सांगितले.भंडारा शहर बायपास रोड दुरुस्तीकरण व अतिभार वाहतूक बंद करण्याबाबतच्या निवेदनावर तात्काळ निर्णय घेवून संबंधितांना सूचना केल्या. शासकीय आधारभूत धान खरेदीसाठी दिलेल्या गोदामाच्या भाडे संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जलयुक्त शिवार, कर्जमाफी, प्रकल्पग्रस्त शेतकºयांना प्रकल्पात गेलेल्या जमीनीची वाढीव रक्कम, भिमलकसा जलाशयाचे पाणी मिळण्याबाबत, नेरला उपसा सिंचन अंतर्गत पिकाचा मोबदला मिळण्याबाबत, गोंडीटोला येथील तेंदु फाटा तलावाचे गेट दुरुस्तीकरण, बावनथडी प्रकल्प उजवा कलवावरुन पाईपलाईन व मौजा सामेवाडा, तालुका लाखनी येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणी उपलब्ध करुन देणे आदी महत्त्वाच्या समस्या पालकमंत्री यांनी या बैठकीत निकाली काढल्या. त्याच प्रमाणे अनेक नागरिकांनी आपल्या वैयक्तिक समस्यांचे निवेदन सादर केली होती. या निवेदनावर पालकमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेवून न्याय देण्याची भूमिका बजावली. यावेळी पालकमंत्री यांनी नागरिकांच्या अनेक समस्यांचा निपटारा केला.