शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विकासात जिल्हा अव्वल ठेवण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:25 IST

प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची व समन्वयाची जबाबदारी महसूल विभागावरच आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : महसूल दिनानिमित्त विविध प्रमाणपत्राचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची व समन्वयाची जबाबदारी महसूल विभागावरच आहे. आजच्या महसूल दिनानिमित्त सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासोबतच आपला जिल्हा विकासात अव्वलस्थानी नेण्याचा संकल्प करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बडे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व तहसिलदार अक्षय पोयाम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी महसूल दिनाचे महत्व विषद केले. यासोबत पीएम किसान योजना अभिलेख्याचे संगणकीकरण, आयुष्मान भारत, घरपोच प्रमाणपत्र या शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना साहित्य व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.कुटूंब अर्थसहाय्य योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय अभियानांतर्गत अंत्योदय शिधापत्रिका, उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस किट व सिलिंडरचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. त्याचप्रमाणे वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतरीत केलेले सातबारा नागरिकांना वाटप करण्यात आले.प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड यांनी केले. शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विलास ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तहसिलदार अक्षय पोयाम यांनी केले. कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी