शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सील

By admin | Updated: March 29, 2016 00:26 IST

७१ हजारांचे थकीत कर प्रकरणी तुमसर नगरपरिषदेने शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह गृहपाल कार्यालय सील केले.

कर थकीत : नगरपरिषदेची कारवाईतुमसर : ७१ हजारांचे थकीत कर प्रकरणी तुमसर नगरपरिषदेने शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह गृहपाल कार्यालय सील केले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. ही कारवाई सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास करण्यात आली.शहरातील बजाज नगरात अभिषेक अग्रवाल यांच्या इमारतीत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह भाड्याने आहे. येथे ८० मुली राहतात. सन २०१४ ते २०१६ पर्यंत तुमसर नगरपरिषदेचे ७१ हजार ३१६ रुपये कर थकीत आहे. जानेवारी महिन्यात नगरपरिषदेने इमारत मालकास लिखीत अल्टीमेटम दिला होता. परंतु थकीत कर भरण्यात आले नाही. त्यामुळे नगरपरिषदेने सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास वसतिगृह गृहपालांचे कार्यालय सील करण्याची कारवाई केली. तत्पूर्वी गृहपालांनी इमारत मालकास थकीत कर भरण्यास कळविले होते. परंतु इमारत मालकाने मी कर भरणार नाही. शासकीय वसतिगृह असल्याने तुम्हीच कर भरा असा पवित्रा घेतला होता. यापूर्वी ही नगरपरिषदेने इमारत मालकाला थकीत कर भरण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या. इमारतीचे भाडे प्रतिमहिना ६ ते ७ हजार इतके आहे. तर वार्षिक नगरपरिषदेचा कर ६८ हजार इतका आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.सदर कारवाई मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने, कर निरीक्षक वहीद खान, मुख्य लिपीक साखरकर, नाशिर अली, चौधरी, गणेश मेहर यांच्या पथकाने केली. (तालुका प्रतिनिधी)