राजेश्वरी मोदी : व्याख्यानमालेचे आयोजनभंडारा : सुंदर, स्वस्त भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्त होऊन वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. अशावेळी गरज आहे, ती योग्य दिशेची व प्रेरणेची, असे प्रतिपादन रेकी ग्रॅन्ड मास्टर राजेश्वरी मोदी (मुंबई) यांनी केले.येथील जे.एम. पटेल महाविद्यालय आशावादी दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी राजेश्वरी मोदी बोलत होत्या. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास वृद्धिंगत व्हावा म्हणून महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना यांच्या सहकार्याने सदर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. यावेळी मंचावर माजी विद्यार्थी संघटनेचे रामविलास सारडा, प्रा. डॉ. कार्तिक पनीकर आदी उपस्थित होते.यावेळी प्राचार्य ढोमणे म्हणाले, समाजात एकोपा राहणे अतिआवश्यक आहे. आशावाद बाळगल्यास कठीण परिस्थितीतही मार्ग मिळू शकतो. इर्षा, राग, लोभ, अन्याय या गोष्टी आजच्या युगात प्राबल्याने पहावयास मिळत आहे. प्रत्येकालाच काही ना काही चिंता नेहमी सतावत असते. प्रत्येक समस्यांचे निराकरण कसे करावे, समस्यांचा सामना कसा करावा म्हणून आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा व्याख्यानांची गरज आहे.स्वत:चे नशिब हातात आहे पण मुठीत नाही, असा युक्तीवादही त्यांनी मोठ्या प्रेरक सूचनेतून व्यक्त केला. यावेळी राजेश्वरी मोदी यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. आशावाद या एका शब्दाचे त्यांनी जिवंत चित्रण विद्यार्थ्यांसमोर मांडून जीवनातील समस्यांवर मात कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन दिले.यावेळी मोदी यांच्या सहकारी स्रेहा चांडक यांनी नारायण रिकी संस्थेची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कार्तिक पनीकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
एकाग्रतेसाठी वाणीवर नियंत्रण आवश्यक
By admin | Updated: August 29, 2015 00:53 IST