शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

By admin | Updated: December 6, 2014 01:04 IST

भारतीय मजदूर संघ जिल्हा भंडारा यांचे वतीने तहसीलदार भंडारा यांना कृषी ग्रामीण मजदूरांच्या समस्येबाबत निवेदन देण्यात आले.

भंडारा : भारतीय मजदूर संघ जिल्हा भंडारा यांचे वतीने तहसीलदार भंडारा यांना कृषी ग्रामीण मजदूरांच्या समस्येबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात, सर्व योजनेचा लाभ नागरिकांना मिळण्याकरिता व लाभार्थी वंचित राहू नये याकरिता सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता श्रमीक संगठनांना संबंधित योजनेत भागीदार बनविण्यात यावे, अत्यंत महत्वाची व आवश्यक मागणी असुन शुध्द पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. सर्व खेडे गावांत शुध्द पाणी पुरवठा व्हावा. सर्व पंचायत समिती आरोग्य दवाखान्यात डॉक्टर व इतर कर्मचारी असणे आवश्यक आहे. वर्ग १२ वी पर्यंत तालुका स्तरावरच्या शाळेत व त्या अंतर्गत शाळेत नि:शुल्क व अन्य सामग्री सहित विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावे. तसेच रोजगार भिमुख शिक्षण खेड्यातून नि:शुल्क देण्यात यावे. ग्रामीण स्तरावर शेतीतून होणाऱ्या उत्पन्नाला कृषी उत्पन्न बाजार समितीतून खरेदी करण्याच्या सोई उपलब्ध व्हाव्या, संबंधित कायदयात दुरुस्ती होऊन २०० दिवसाचे काम उपलब्ध करुन देण्यात यावे. सर्व प्रकारच्या ग्रामीण मजदूरांना मनरेगा, आशाकर्मी, शिक्षामित्र, शेतकरी मित्र, अंगणवाडी, शेतमजूर, रोजगारसेवक, विटाभट्टी आदी ग्रामीण मजदूरांना किमान १०,००० रूपये वेतन देण्यात यावे., ग्रामीण मजदूरी करणाऱ्या कारागिरांना उत्कृष्ट सेवाच्या आधारावर किमान वेतन ठरविण्यात यावे. वरील मागण्यांचे निवेदन तहसीलदार सी. टी. तेलंग यांचे मार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले. निवेदन देताना भंडारा भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष गजानन कावळे, बोहटे, मनोहर हेडाऊ, प्रदीप किटे, दिपक डहारे यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)